ख्रिस गेलवर कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि संतापलेल्या गेलने मैदानातच आपली बॅट फेकली. त्यामुळे सामन्यात त्याने केलेल्या कृत्यामुळे सामना अधिकाऱ्यांनी त्याला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. 

दुबई : पंजाबचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने तुफानी फटकेबाजी करत ९९ धावांची खेळी केली. ६३ चेंडूत ६ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार मारलेही, पण शतकापासून एक धाव दूर असताना गेल आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि संतापलेल्या गेलने मैदानातच आपली बॅट फेकली. त्यामुळे सामन्यात त्याने केलेल्या कृत्यामुळे सामना अधिकाऱ्यांनी त्याला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. 

बॅट फेकून गेलने आयपीएलच्या आचारसंहितेच्या २.२ मधील लेव्हल १ चं उल्लंघन केले आहे. म्हणजेच त्याने खेळाला न शोभणारे कृत्य केले. त्यामुळे त्याला सामना शुल्काच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी, सामना पंचाचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. याव्यतिरिक्त मैदानात षटकारांचा पाऊस पाडत ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये हजार षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे.

संबंधित बातम्या