तो नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला आणि भारताचा स्ट्राईक बॉलरच झाला

T natrajan
T natrajan

नवी दिल्ली- 'तुमच्या स्वप्नांच्या पाठीमागे धावा, ते खरे होतील, असे उद्गार आपल्या चाहत्यांना क्रिकेटच्या देवाच्या भूमिकेत दिसणाऱ्या सचिन तेंडूलकरने 2013मध्ये वानखेडेवर क्रिकेटकधून निवृत्ती घेताना म्हटले होते. हे वाक्य अनेक खेळाडूंनी आपल्या आयुष्यात अक्षरश: कोरून ठेवत पुढे आगेकूच केली. असाच एक खेळाडू भारतीय संघाला नुकताच मिळाला आहे. तामिळनाडूमधील सालेम येथील थंगारसू नटराजनचा एक नेट गोलंदाज ते भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज म्हणून अचानक जादू व्हावी तसा उदय झाला आहे.    

नटराजन आणि लक फॅक्टर-

26 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. त्यात एक टीप लिहिण्यात आली होती. चार अतिरिक्त गोलंदाज-  कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, ईशान पोरेल आणि टी नटराजन असे चार गोलंदाज भारतीय संघासोबत प्रवास करतील. म्हणजे नटराजन हा भारतीय संघाबरोबर एक नेट गोलंदाज म्हणून प्रवास करणार होता. मात्र, त्याला अचानक मर्यादित षटकांच्या खेळात सामील करून घेण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला. 29 वर्षीय नटराजनला त्याच्या आयपीएलमधील प्रदर्शनामुळे नेट गोलंदाजाच्या यादीतून मुख्य गोलंदाजांच्य़ा यादीत येण्यासाठी मदत झाली. 

एका हातमजुराच्या घरात जन्मलेल्या या मध्यमगती गोलंदाजाने वयाच्या 20व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळताना त्याने राशिद खाननंतर संघासाठी  सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याने या मोसमात एकूण 16 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची भारताच्या फलदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी निवड करण्यात आली. मात्र, त्याचे नशीब त्याला थेट भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज होण्यापर्यंत घेऊन आले.      

आयपीएलमधील उत्कृष्ट प्रदर्शनानंतर तामिळनाडू संघाचाच आणखी एक खेळाडू वरूण चक्रवर्ती यालाही भारतीय संघात संधी मिळाली होती. कोलकाता नाइट रायडर्स कडून खेळताना त्याने अतिशय प्रभावी कामगिरी केली. मात्र, ऐनवेळी झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला संघात वर्णी लागूनही माघार घ्यावी लागली. यानंतर त्याच्या जागी कोणाला संघात घ्यायचे असा प्रश्न निवड समितीला पडला असताना याचवेळी नटराजनची संघात वर्णी लागली.
 
यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही त्याची संघात निवड करण्यात आली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर शेवटच्या सामन्यात नटराजनला संधी देण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात मात्र प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  भारताने उभारलेल्या 302 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची मात्र दाणादाण उडाली. याच सामन्यात दणदणीत सुरूवात करणाऱ्या नटराजनने 70 धावांमध्ये 2 बळीही घेतले. याबरोबरच ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवण्यात भारतीय संघाला यशही आले. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com