अँटी डोपिंग चाचणीत दोषी अढळल्याने सुमित मलिकचे निलंबन

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 4 जून 2021

सुमित 122 किलो वजनी गटात ऑलिंपिकमध्ये खेळणार होता. त्याने 2018 कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले होते.

अँटी डोपिंगचे (Anti Doping) उल्लंघन केल्याबद्दल युनाटेड वर्ल्ड रेसलिंगने (United World Wrestling) कुस्तीपटू सुमित मलिक याला निलंबित केले आहे. अँटी डोपिंग टेस्टमध्ये सुमित दोषी अढळला असून, त्याने बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन केले. यामुळे टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympic) आधी भारताला मोठा धक्का बसला आहे. 

गोव्यात जिल्हा पातळीवर खेलो इंडिया केंद्रांचा होणार विकास

सुमित 122 किलो वजनी गटात ऑलिंपिकमध्ये खेळणार होता. त्याने 2018 कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले होते. या आधी डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढलल्याने नरसिंग यादववर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. येणाऱ्या 10 जून रोजी सुमितची आणखीन एक चाचणी करण्यात येईल. तोपर्यंत त्याचे तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याच्यावर सुनावणी करण्यात येईल. असे भारतीय कुस्ती महासंघाने स्पष्ट केले आहे. 

संबंधित बातम्या