आयपीएल 2020: सनराईजर्स हैदराबादच्या अंधूक आशा अजूनही जिवंत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

हैदराबादच्या अंधुक आशा अजूनही जिवंत आहेत. इतर संघांच्या कामगिरीवरही त्यांचे भवितव्य अवलंबून असणार असले तरी ते पुढचा विचार न करता आजचा सामना जिंकण्यावर भर देतील, त्यामुळे आज दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

दुबई- दिल्लीला आयपीएलची बाद फेरी निश्‍चित करण्यासाठी एका विजयाची गरज असली तरी गेल्या दोन सामन्यांत झालेले पराभव त्यांना सर्वच बाबतीत फेरविचार करायला लावणारे आहेत.  आज हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गाडी रुळावर आणण्यासाठी त्यांना कडवे प्रयत्न करावे लागणार आहेत.

हैदराबादच्या अंधुक आशा अजूनही जिवंत आहेत. इतर संघांच्या कामगिरीवरही त्यांचे भवितव्य अवलंबून असणार असले तरी ते पुढचा विचार न करता आजचा सामना जिंकण्यावर भर देतील, त्यामुळे आज दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. नवोदितांचा संघ म्हणून ओळखला जाणारा दिल्लीचा संघ विजयी वाटेवर असताना अचानक दोन पराभवांना सामोरा गेला. शिखर धवनच्या अनुभवाचा दिल्लीला या सामन्यात उपयोग करून घ्यावे लागणार आहे. अन्यथा आयपीएलमधील पुढचे सामने त्यांना अडचणीचे ठरतील.   
 

संबंधित बातम्या