विराटच्या नेतृत्वाखालील संघ भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम: गावसकर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

समतोल, क्षमता, कौशल्य तसेच संयम या सर्व निकषांचा विचार केल्यास हा संघ सर्वोत्तम ठरतो, असे सुनील गावसकर यांनी नमूद केले. 

नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ आतापर्यंतचा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ आहे. प्रभावी भेदक गोलंदाजीमुळे संघ जास्त समतोल झाला आहे, असेही सुनील गावसकर यांनी सांगितले. 

कोहली कर्णधार असलेला भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल आहे, तसेच या संघाने ऑस्ट्रेलियात गतमोसमात मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. समतोल, क्षमता, कौशल्य तसेच संयम या सर्व निकषांचा विचार केल्यास हा संघ सर्वोत्तम ठरतो, असे गावसकर यांनी नमूद केले. 

कोणत्याही खेळपट्टीवर भारतास विजयी करू शकतील असे गोलंदाज या संघात आहेत. या संघातील फलंदाजीची तुलना १९८० च्या संघाशी करता येईल, पण गोलंदाजीमुळे हा संघ सरस होतो. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या