Sunil Gavaskar: दिग्गज खेळाडू T20 क्रिकेटमधून होणार निवृत्त, गावस्करांच्या वक्तव्याने खळबळ

Sunil Gavaskar On Team India: टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कप 2022 मधील प्रवास इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने संपला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Sunil Gavaskar On Team India Senior Players: टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कप 2022 मधील प्रवास इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने संपला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला यावेळी केवळ उपांत्य फेरी गाठता आली. टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या एका वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. इंग्लंडकडून 10 गडी राखून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाचे काही वरिष्ठ खेळाडू निवृत्तीची घोषणा करु शकतात, अशी शक्यता सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे.

गावस्कर यांच्या वक्तव्यामुळे घबराट निर्माण झाली

रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू शकतो. रोहितने कर्णधारपद सोडल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ही जबाबदारी स्वीकारेल, असा विश्वास दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केला आहे.

Team India
Team India: टीम इंडियाच्या 'Mr 360' चे एका वर्षात बदलले नशीब, आज खेळतोय कोटीत!

स्टार स्पोर्ट्सवर गावस्कर म्हणाले की, 'इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हार्दिकने आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले.'

हा खेळाडू संघाची कमान सांभाळू शकतो

सुनील गावसकर पुढे म्हणाले की, 'हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भविष्यात संघाची जबाबदारी निश्चितपणे सांभाळेल. तर काही खेळाडू निवृत्तही होतील. खेळाडूंनी याचा विचार केला पाहिजे. काही खेळाडू 30 ते 40 वयोगटातील आहेत, जे भारतीय T20 आंतरराष्ट्रीय संघातील त्यांच्या स्थानावर पुनर्विचार करत असतील.'

Team India
Team India त पुनरागमनासाठी सज्ज झाला खेळाडू, नाव ऐकताच थरथरतात विरोधक!

या खेळाडूंना संघातून डिस्चार्ज मिळू शकतो

विराट कोहली या विश्वचषकात संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे, परंतु 30 ते 40 वयोगटातील कर्णधार रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक या वरिष्ठ खेळाडूंसाठी ही स्पर्धा निराशाजनक होती. रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक यांनी आयपीएल 2022 नंतरच टीम इंडियाच्या T20 संघात पुनरागमन केले, तर आगामी मालिकेत ते T20 संघाचा भागही नाहीत. रोहित शर्मा आता बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघातही दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com