Asia Cup: 'अशा लोकांना एक थप्पड लगावली पाहिजे...', टीम इंडिया चॅम्पियन झाल्यावर गावसकर असं का म्हणाले?

Sunil Gavaskar On Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
Sunil Gavaskar
Sunil GavaskarDainik Gomantak

Sunil Gavaskar On Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. याआधी सुपर-4मध्ये टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती.

भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. पण दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी काही खास नव्हती. जर भारताने हा सामना गमावला असता तर पाकिस्तानचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडू शकला असता.

भारताचा डाव संपल्यानंतर सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगबाबतचे मीम्स मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले. आता या घटनेवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

सुनील गावसकर यांनी सडेतोड उत्तर दिले

टीम इंडियाला मुद्दाम श्रीलंकेविरुद्धचा सुपर-4 सामना गमावायचा आहे, जेणेकरुन पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल, असे म्हणणाऱ्यांना सुनील गावसकर यांनी जोरदार फटकारले.

गावसकर मिड-डेसाठी लिहिलेल्या आर्टिकलमध्ये म्हणाले की, 'श्रीलंकेविरुद्ध भारताने मुद्दाम सामना गमावला, असे म्हणणाऱ्या थप्पड लगावली पाहिजे.

भारत हरल्यामुळे पाकिस्तान अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, असं म्हणणारे लोक किती अज्ञानी आणि मूर्ख आहेत यावरुन दिसते.

भारत श्रीलंकेकडून (Sri Lanka) सामना हरला आणि पाकिस्तान संघाने श्रीलंकेचा पराभव केला, त्यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला असता.

तर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नसता, या शक्यतेचा विचारही या लोकांनी केला नाही. अशा स्थितीत भारत जाणूनबुजून का श्रीलंकेकडून हरेल?'

Sunil Gavaskar
Asia Cup 2023: नटखट इशानने केली विराटची नक्कल, मग किंग कोहलीनंही दिली भन्नाट रिऍक्शन, पाहा Video

गावसकर पुढे म्हणाले, 'जेव्हा पाकिस्तान (Pakistan) श्रीलंकेकडून हरला आणि स्पर्धेतून बाहेर पडला, तेव्हा आम्हाला अपेक्षित होते की, लोक पराभवासाठी भारताला जबाबदार ठरवतील. त्यांनी त्यावेळी कर्णधार बाबर आझमला प्रश्न विचारायला पाहिजे होते.

2019 विश्वचषकाच्या ग्रुप सामन्यात भारत इंग्लंडकडून पराभूत झाला तेव्हाही अशाच प्रकारचे तर्क-वितर्क लढवले गेले होते. धोनीसह सर्वांनी जाणीवपूर्वक संथ फलंदाजी केल्याचा आरोप करण्यात आला होता. जे धोनीला ओळखतात ते हे मान्य करणार नाहीत.'

Sunil Gavaskar
Asia Cup 2023 Prize Money: आशिया कप जिंकून टीम इंडिया बनली मालमाल, श्रीलंकेवरही पैशांचा पाऊस; जाणून घ्या किती मिळाली रक्कम!

टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला

टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला अवघ्या 50 धावांत गुंडाळून 37 चेंडूत लक्ष्य गाठून 8व्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा 'हिरो' मोहम्मद सिराज ठरला. या सामन्यात त्याने एकूण 6 विकेट घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com