कोलकात्याला निराश करून हैदराबाद 'प्लेऑफ'मध्ये

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

बाद फेरीसाठी विजय आवश्‍यक असलेल्या हैदराबादने ताकदवर मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. अनेकांचे सल्ले आणि विरोध झुकारुन रोहित शर्मा मैदानात उतरला, परंतु मुंबईला ८ बाद १४९ धावाच करता आल्या.

शारजा- बलाढ्य मुंबई इंडियन्सचा दहा विकेटने पराभव करुन हैदराबादने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले त्यांच्या या विजयाने कोलकाताचे स्वप्न भंगले त्यांचे आव्हान संपुष्टात आले. ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात हैदराबादचा सामना बंगळूरविरुद्ध होईल.

बाद फेरीसाठी विजय आवश्‍यक असलेल्या हैदराबादने ताकदवर मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. अनेकांचे सल्ले आणि विरोध झुकारुन रोहित शर्मा मैदानात उतरला, परंतु मुंबईला ८ बाद १४९ धावाच करता आल्या. हे आव्हान हैदराबादने १७.१ षटकात पार केले. 
कर्णधार डेव्हिड वॉर्नर (नाबाद ८५) आणि वृद्धिमन साहा (नाबाद ५८) यांनी बुमरा, बोल्ट यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबई गोलंदाजांना पुरते निष्प्रभ केले.

रोहितचा मॅच फिटनेस

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोका न स्वीकारण्याचा सल्ला देऊनही रोहित शर्मा या सामन्यात खेळला. फलंदाजीत तो सात चेंडू मैदानात होता त्यात त्याने डिकॉकने मारलेल्या चेंडूवर दुहेरी धावा काढली, स्वतः एक धाव जोरात धावला त्यानंतर क्षेत्ररक्षणही करुन मॅच फिटनेस दाखवण्याचा प्रयत्न केला. 
 

संबंधित बातम्या