मनीष पांडेची निर्णायक खेळी; 'सनरायजर्स हैदराबाद' ८ गडी राखून विजयी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

यंदाचा पहिला सामना खेळणाऱ्या जेसन होल्डरच्या प्रभावी गोलंदाजीमुळे हैदराबादने राजस्थानला १५४ धावांवर मर्यादित ठेवले त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टॉ अपयशी ठरूनही हैदराबादने हा सामना जिंकण्याचा पराक्रम केला.

दुबई- काही वर्षांपूर्वी प्रामुख्याने ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताचे भवितव्य म्हणून पाहिले जात असलेल्या मनीष पांडेने आपल्यावरील विश्‍वास यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर आज सिद्ध केला. नाबाद ८३ धावांची शानदार खेळी त्याने साकार केली त्यामुळे हैदराबादने आव्हानातील धुगधुगी कायम ठेवली. आजच्या सामन्यात त्यांनी राजस्थानचा आठ विकेटने पराभव केला.

यंदाचा पहिला सामना खेळणाऱ्या जेसन होल्डरच्या प्रभावी गोलंदाजीमुळे हैदराबादने राजस्थानला १५४ धावांवर मर्यादित ठेवले त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टॉ अपयशी ठरूनही हैदराबादने हा सामना जिंकण्याचा पराक्रम केला. 

एकीकडे मनीष पांडे निर्णायक खेळी करत असताना दुसरीकडे विजय शंकरनेही नाबाद ५२ धावां फटकावल्या या दोघांनी १५.३ षटकांत नाबाद १४० धावांची भागीदारी  केली. 
उथप्पा, स्टोक्‍सने संधी गमावली

रॉबीन उथप्पाने राजस्थानला आश्‍वासक सुरुवात करुन दिली होती, परंतु तो स्वतःच्याच चुकीने धावचीत झाला. त्यानंतर बेन स्टोक्‍स आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु धावांची गती हळू हळू कमी होत गेली होती. सॅमसन पुन्हा एकदा जम बसल्यावर बाद झाला. स्टोक्‍सने भले ३० धावा केल्या मात्र ३० चेंडू खेळल्यानंतर त्याला अवघे दोनच चौकार मारता आले होते त्यात एक जीवदानही मिळाले होते. राजस्थानला दीडशे धावा कठीण वाटत होत्या, परंतु अंतिम षटकांत जोफ्रा आर्चरने फटकावलेल्या सात चेंडूतील नाबाद १६ धावा त्यांना १५४ धावांपर्यंत मजल मारुन देण्यात मोलाच्या ठरल्या. पहिलाच सामना खेळणाऱ्या जेसन होल्डरन तीन विकेट मिळवल्या.
 

संबंधित बातम्या