विराटसेना स्पर्धेतून बाहेर.. हैदराबाद ‘क्वालिफायर-२’ मध्ये !

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

अखेरच्या षटकापर्यंत रंगतादार झालेल्या हैदराबादने आत्तापर्यंत सुदैवी ठरलेल्या बंगळूर संघाचा सहा विकेटने पराभव करुन आयपीएलच्या क्वालिफायर-२ सामन्यात मुसंडी मारली.

अबुधाबी :  अखेरच्या षटकापर्यंत रंगतादार झालेल्या हैदराबादने आत्तापर्यंत सुदैवी ठरलेल्या बंगळूर संघाचा सहा विकेटने पराभव करुन आयपीएलच्या क्वालिफायर-२ सामन्यात मुसंडी मारली. विल्यमसन नाबाद (५०) आणि जेसन होल्डर (नाबाद २५) यांनी केलेली नाबाद ६५ धावांची भागीदारी निर्णयक ठरली. 

हैदराबादची ४ बाद ६७ अशी अवस्था झालेली असताना विल्यमसन आणि होल्डर यांची जोडी जमली यांनी डाव सावरताना संघाला विजयी मार्गावर ठेवले. या पराभवामुळे बंगळूरचे आव्हान संपुष्टात आले. 

साहाला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी संधी देण्यात आलेल्या श्रीवत्स गोस्वामी भोपळाही फोडू शकला नाही. डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे ४१ धावांची भागीदारी केली, परंतु पांडेनंतर वॉर्नरही बाद झाल्यावर हैदरादवरचे दडपण वाढत गेले.
विराट कोहलीने फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करताना स्वतः सलामीला आला पण ही चाल यशस्वी ठरली नाही. तसेच फॉर्मात असलेल्या देवदत्त पदिकल्लनेही आज निराशा केली त्यामुळे बंगळूरची २ बाद १५ अशी अवस्था झाली होती. पण एबी डिव्हिल्यर्सच्या ५६ धावांच्या खेळीमुळे बंगळूरला १३१ धावा करता आल्या. 
संक्षिप्त धावफलक ः बंगळूर २० षटकांत ७ बाद १३१ (ॲरॉन फिन्च ३२ -३० चेंडू, ३ चौकार, १ षटकार, एबी डिव्हिल्यर्स ५६ -४३ चेंडू, ५ चौकार, महम्मद सिराज नाबाद १० -७ चेंडू, १ चौकार, जेसन होल्डर २५-३,  नटराजन ३३-२) पराभूत वि. हैजराबाद ः १९.४ षटकांत ४ बाद १३२(डेव्हिड वॉर्नर १७ -१७ चेंडू, ३ चौकार, मनीष पांडे २४ -२१ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, केन विल्यमसन नाबाद ५० -४४ चेंडू, २ चौकार, २ षटकार, जेसन होल्डर नाबाद २४ -२० चेंडू, ३ चौकार, सिराज २८-२)
 

संबंधित बातम्या