SunRisers Hyderabad ने लॉच केली IPL 2022साठी नवी जर्सी

सनरायझर्स हैदरबाद संघाने चाहत्यांना (Fans) मोठी बातमी दिली आहे.
IPL 2022
IPL 2022 Twitter/@@SunRisers

सनरायझर्स हैदरबाद संघ 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगरुळ येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या लिलावात अनेक स्टार खेळाडुंना करारबद्ध करण्यासाठी सज्ज आहे. पण लिलावापूर्वीच संघाने आपल्या चाहत्यांना (Fans) मोठी बातमी दिली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघ नव्या जर्सीसह मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. (SunRisers Hyderabad New jersery)

सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या ध्येयाने मैदानावर उतरणार आहे. SRH ने बुधवारी त्यांच्या पुन्हा डिझाईन केलेल्या जर्सीची झलक सोशल मिडियावर (Social Media) शेयर केली. सनरायझर्सने ट्विट (Twitter) केले. आम्ही नवीन जर्सी #OrangeArmour साठी #OrangeArmy. सनरायझर्स हैदराबादने आपल्या जर्सीचे केशरी आणि काळा रंग कायम ठेवला आहे पण नवीन जर्सी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आकर्षक दिसत आहे.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2022 साठी एक नवीन थिंक टॅंक निवडला आहे, ज्यामध्ये प्रशिक्षक ब्रायन लारा, मुथय्या मुरलीधर, डेल स्टेन, सायमन कॅटिच, हेमाग बदानी आणि टॉम मुडी हे अफाट क्रिकेट (Cricket) अनुभव असलेले मुख्य प्रशिक्षक आहेत. न्यूझीलंड राष्ट्रीय संघाचा कर्णधार केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली, या संघात उमरान मलिक आणि अब्दुल समद निवृत्त रायझर्ससारखे युवा स्टार आहेत.

सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियन सलामवीर डेव्हिड वॉर्नर, अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान आणि भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना सोडले आहे. मागच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदरबाद संघाची खेळी वाईट होती. संघाला 14 पैकी केवळ तीन सामने जिंकता आले आणि 11 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलमध्ये (IPL)सर्वाधिक धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला गेल्या आयपीएलमध्ये कर्णधारपदावरुण काढण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com