आज मुंबईची रंगीत तालीम तर हैदराबादसाठी आज 'करो या मरो' स्थिती

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

प्लेऑफसाठी जसप्रित बुमरा आणि टेंट्र बोल्ट तंदुरुस्त रहावे यासाठी त्यांना उद्याच्या सामन्यात विश्रांती निश्‍चित समजली जात आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून ते सर्व सामने खेळलेले आहेत.

शारजा- आयपीएलचा उद्या अखेरचा साखळी सामना होत आहे. क्‍लॉलिफायर-१ या सामन्यातील प्रवेश निश्‍चित करणाऱ्या मुंबईला हैदराबाद आव्हान देणार आहे. हा सामना जिंकला तर हैदराबादला बाद फेरी गाठता येणार आहे. सामन्याचा निकालावर काहीही परिणाम होणार नसल्यामुळे मुंबई राखीव खेळाडूंना संधी देणार असल्याचे समजते.
प्लेऑफसाठी जसप्रित बुमरा आणि टेंट्र बोल्ट तंदुरुस्त रहावे यासाठी त्यांना उद्याच्या सामन्यात विश्रांती निश्‍चित समजली जात आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून ते सर्व सामने खेळलेले आहेत. त्यामुळे धवल कुलकर्णी आणि मॅक्‍लेन्घन यांना पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकेल.

फलंदाजीत फारसे बदल संभवत नाहीत. रोहित शर्माबाबत उत्सुकता कायम आहे. यष्टीरक्षक क्विन्टॉन डिकॉकला विश्रांती दिली जाऊ शकते, त्यामुळे ईशान किशन यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळू शकेल. हैदराबादचा संघ मात्र सर्वस्व पणास लावून विजयासाठी प्रयत्न करेल.

संबंधित बातम्या