अखेरचा चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात सुपरनोवास विजयी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

सुपरनोवासने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून ट्रेलब्लेझर्सचा दोन धावांनी पराभव केला आणि महिला चॅलेंजर्स ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. आता सोमवारी याच दोन संघात अंतिम सामना होणार आहे.

शारजा : सुपरनोवासने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून ट्रेलब्लेझर्सचा दोन धावांनी पराभव केला आणि महिला चॅलेंजर्स ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. आता सोमवारी याच दोन संघात अंतिम सामना होणार आहे.
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सुपरनोवासने हा सामना जिंकल्यामुळे तिन्ही संघांचे समान दोन गुण झाले परंतु ट्रेलब्लेझरची सरासरी (+२.१०९) सर्वोत्तम ठरली त्यानंतर सुपरनोवासने (-०.०५४) व्हेलोसिटी संघापेक्षा (-१.८६९) चांगली सरासरी मिळवल्यामुळे त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करता आला. 

सुपरनोवासने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानासमोर ट्रेलब्लेझर्सच्या दीप्ती शर्मा (४३) आणि हर्लिन देओल (२७) यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला होता, परंतु एक चेंडू असताना देओल बाद झाली आणि त्यांचा विजय हुकला.
संक्षिप्त धावफलक ः सुपरनोवास ः २० षटकांत ६ बाद १४६ (प्रिया पुनिया ३० -३७ चेंडू, ३ चौकार, चमारी अटापट्टू ६७ -४८ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार, हरमनप्रित कौर ३१- २९ चेंडू, १ चौकार, १ षटकार, जुलन गोस्वामी १७-१, हर्लिन देओल ३४-१) वि. वि. ट्रेलब्लेझर्स ः २० षटकांत ५ बाद १४४ (डेनेंद्रा डॉटिन २७ -१५ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, स्मृती मानधाना ३३ -४० चेंडू, २ चौकार, १ षटकार, दीप्ती शर्मा नाबाद ४३ -४० चेंडू, ५ चौकार, हर्लिन देओल २७ -१५ चेंडू, ३ चौकार, राधा यादव ३०-२, शाकेरा सेलाम ३१-२).

संबंधित बातम्या