
Mahendra Singh Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. आम्रपाली ग्रुप आणि धोनी यांच्यातील व्यवहाराबाबत ही नोटीस जारी करण्यात आली आहे. धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. आम्रपाली ग्रुपकडून सदनिकेचा ताबा खरेदीदारांना देण्याबाबत वाद सुरु असून, त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
काय प्रकरण आहे
वास्तविक, महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) आम्रपाली ग्रुपकडून 150 कोटी रुपये घ्यायचे आहेत. याप्रकरणी फ्लॅट खरेदीदारांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती की, 'एवढे पैसे देऊनही धोनी प्लॅट देऊ शकला नाही'. सर्वोच्च न्यायालयाने धोनीची बाजू जाणून घेण्यासाठी त्याला नोटीस पाठवली आहे. यापूर्वी आम्रपाली ग्रुप आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील व्यवहाराचे हे प्रकरण उच्च न्यायालयात होते. उच्च न्यायालयाने (High Court) एक समिती स्थापन करुन हे प्रकरण सोडवण्याचे काम दिले होते.
यानंतर, फ्लॅट खरेदीदारांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करुन आम्रपाली समूहाकडे कमी निधी असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हाला सदनिका मिळू शकल्या नाहीत.
दुसरीकडे, मुदत संपल्यानंतरही फ्लॅटचा ताबा न दिल्याचा आणि पैसे घेतल्याचा आम्रपाली ग्रुपवर आरोप आहे. त्यानंतरही फ्लॅट्स अद्याप तयार झाले नसल्याचे समोर आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. महेंद्रसिंग धोनी हा समूहाचा दीर्घकाळ ब्रँड अॅम्बेसेडर होता आणि त्याने अनेक जाहिरातीही केल्या होत्या. नोएडामध्ये आम्रपाली ग्रुपच्या विरोधात निदर्शने होत असताना धोनीविरोधात मोहीमही चालवण्यात आली होती. त्यानंतर त्याने आम्रपाली ग्रुपपासून फारकत घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.