सुरेश रैनाच्या निवृत्तीचे हुकले टायमिंग

.
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीबरोबर राम-लक्ष्मणाप्रमाणे नाते असलेल्या सुरेश रैनाने धोनीच्या निवृत्ती घोषणेनंतर लगेचच आपल्या निवृत्तीचीही घोषणा केली; परंतु तो प्रोटोकॉलप्रमाणे बीसीसीआयला कळवायला विसरला, अखेर त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ तारखेला अधिकृतपणे बीसीसीआयला कळवले.

नवी दिल्ली:  भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीबरोबर राम-लक्ष्मणाप्रमाणे नाते असलेल्या सुरेश रैनाने धोनीच्या निवृत्ती घोषणेनंतर लगेचच आपल्या निवृत्तीचीही घोषणा केली; परंतु तो प्रोटोकॉलप्रमाणे बीसीसीआयला कळवायला विसरला, अखेर त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ तारखेला अधिकृतपणे बीसीसीआयला कळवले.

धोनीने ६.२९ या विशिष्ट वेळेचा उल्लेख करत १५ ऑगस्टला निवृत्ती सोशल मीडियावरून जाहीर केली आणि क्रिकेटविश्‍वात खळबळ उडाली. त्यावेळी धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघातील सहकारी रैनासह काही खेळाडूंबरोबर होता. धोनीच्या निवृत्तीचे वृत कळताच रैनालाही मोठा धक्का बसला, त्यानेही भावनेच्या भरात आपली निवृत्ती जाहीर केली.

नियमाप्रमाणे एखाद्या खेळाडूने निवृत्त व्हायचे असेल तर बीसीसीआयला अधिकृतपणे त्याची माहिती देणे आवश्‍यक असते. 

संबंधित बातम्या