IPL 2021: हरभजन सिंगच्या पाया पडला सुरेश रैना; व्हिडिओ होतोय व्हायरल

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात काल सामना खेळला गेला.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात काल सामना खेळला गेला. जिथे फाफ डु प्लेसिसची नाबाद 95 धावांची खेळी आणि दीपक चहर च्या गोलंदाजीने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 18 धावांनी पराभव केला. सामन्यातील सर्वात विशेष क्षण होता तो म्हणजे जेव्हा हरभजन सिंग आणि सुरेश रैना एकत्र दिसले. सामन्यापूर्वी हरभजन सिंग (HARBHAJAN SINGH) मैदानात सराव करण्यासाठी येताच सुरेश रैना त्याच्या पाया पडला. भज्जीही जमिनीवर पडला. हे पाहून जवळ उभे असलेल्या इम्रान ताहिरला हसू आवरले नाही.  संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  (Suresh Raina fell at the feet of Harbhajan Singh; The video is going viral)

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपवरती भारतीय खेळाडूंचा कब्जा

चेन्नई आणि कोलकाता दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात सराव करत होते. त्यानंतर हरभजन सिंग इम्रान ताहिरकडे आला आणि दोघे जण बोलू लागले. त्यानंतरच सुरेश रैना (SURESH RAINA) मैदानावर पोहोचला. तो थेट हरभजन सिंगकडे आला आणि त्याने हरभजनचे पाय पकडले . भज्जीही खाली पडला आणि त्याला मिठी मारली. जवळ उभे असलेले खेळाडू हसू लागले. 

शेवटचे दोन सामने जिंकल्याचा आत्मविश्वास घेऊन चेन्नई मैदानात उतरलेली होती.  चेन्नई सुपर किंग्जने ड्युप्लेसीसच्या नाबाद 95 धावा आणि गायकवाडच्या 64 धावांच्या मदतीने तीन बाद 220 धावांपर्यंत मजल मारली. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पॅट कमिन्सने नाबाद 66 (34 चेंडूत, चार चौकार, सहा षटकार), आंद्रे रसेलच्या 54 धावा (22 चेंडूत, तीन चौकार आणि सहा षटकार) आणि दिनेश कार्तिक (40 धावा, 24 चेंडूत, चार चौकार, दोन षटकार) यांच्या खेळी व्यर्थ ठरल्या. केकेआरने 202 धावा  केल्या. 

संबंधित बातम्या