सूर्यकुमारमध्ये दिसून येतेय  ज्वलंत इच्छाशक्ती : पोलार्ड

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वगळण्यात आल्याची नाराजी सूर्यकुमार यादवला सतावत आहे याची जाणीव पोर्लाडलाही आहे, म्हणूनच त्याने ‘ज्वलंत इच्छाशक्ती’ असलेला सूर्यकुमार असा उल्लेख केला.

अबुधाबी :  रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या किएरॉन पोलार्डने सूर्यकुमार यादवचे भरभरून कौतुक केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वगळण्यात आल्याची नाराजी सूर्यकुमार यादवला सतावत आहे याची जाणीव पोर्लाडलाही आहे, म्हणूनच त्याने ‘ज्वलंत इच्छाशक्ती’ असलेला सूर्यकुमार असा उल्लेख 
केला.

सूर्यकुमारची ही खेळी फारच मौल्यवान होती. धावांचा पाठलाग करताना पहिल्या तीन किंवा चार फलंदाजांपैकी एकाने विजय मिळवेपर्यंत एक बाजू सांभाळली पाहिजे, असे आम्ही म्हणत असतो. सूर्यकुमारने ही जबाबदारी वारंवार घेतली आहे, असे पोलार्डने सामन्यानंतर सांगितले.

नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तत्पर असलेल्या सूर्यकुमारने आपली दर्जा आणि गुणवत्ता दाखवली, आपण किती सक्षम फलंदाज आहोत हे सिद्ध करताना मनामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची किती प्रबळ इच्छाशक्ती आहे हे दाखवून दिले, असेही पोलार्ड म्हणाला.

संबंधित बातम्या