आर्चरच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराचं सूर्यकुमारने सांगितलं सिक्रेट

आर्चरच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराचं सूर्यकुमारने सांगितलं सिक्रेट
Suryakumar revealed the secret of the six hit on Archers ball

अहमदाबाद:  ( Suryakumar revealed the secret of the six hit on Archers ball) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या  चौथ्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची धडाक्यात सुरुवात केली. सूर्यकुमारने दुसऱ्याच सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सहा चौकार आणि तीन षटकारांची बरसात करत आपल्या पदार्पणाच्य़ा इंनिग्समध्येच सूर्यकुमारने 31 चेंडूमध्ये 57 धावा ठोकल्या.

सूर्यकुमारला कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र गुरुवारी पार पडलेल्या चौथ्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. सूर्यकुमारने कारकिर्दीमधील पहिल्याच सामन्यामध्ये षटकार ठोकला, आणि तो ही इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर. जोफ्राच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग असा षटकार ठोकत सूर्यकुमारने आपली प्रतिभा सर्वांना दाखवून दिली. या सामन्य़ामध्ये सूर्यकुमारला 'मॅन ऑफ द मॅच' चा किताब देऊन गौरवण्यात आले. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने सूर्यकुमार यादवची एक विशेष मुलाखत घेतली. आणि या मुलाखतीचा व्हिडिओसुध्दा ट्विटरवरुन शेअर केला. ( Suryakumar revealed the secret of the six hit on Archers ball)

या मुलाखतीत, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची हिंमत कशी आली? असा प्रश्न शार्दुलने सूर्यकुमारला विचारला. त्यावर सूर्यकुमारने, ‘’मी जोफ्रा आर्चरची गोलंदाजी नेहमी पाहत आलो आहे....आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हाही नवीन फलंदाज मैदानावर उतरतो तेव्हा तो त्याला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. मी त्याच्याविरोधात दोन ते तीन वर्षापासून खेळतोय, त्यामुळे त्याबाबत मला सर्वंकश माहिती आहे... मी मारलेला शॉट आधिपासूनच खेळत आलो आहे... लोकल क्रिकेट, डोमॅस्टीक क्रिकेट... जेव्हा मी क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा रबर बॉल, टेनिस बॉलने सिमेंटवर खेळायचो... आणि तेव्हापासूनच हा शॉट मी विकसीत केला. आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहचला,’’ असं सूर्यकुमारने सांगितले.


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com