Team India: टीम इंडियाच्या 'Mr 360' चे एका वर्षात बदलले नशीब, आज खेळतोय कोटीत!

SuryaKumar Yadav Net Worth: टीम इंडियाचा 'मिस्टर 360' म्हणजेच डॅशिंग बॅट्समन सूर्यकुमार यादव सध्या टीमचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDank Gmantak

SuryaKumar Yadav Net Worth: टीम इंडियाचा 'मिस्टर 360' म्हणजेच डॅशिंग बॅट्समन सूर्यकुमार यादव सध्या टीमचा महत्त्वाचा भाग बनला आहे. सूर्यकुमार यादवचे आयुष्य क्रिकेट अडचणींनी भरलेले असले तरी आज तो करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. सूर्यकुमारने गेल्या वर्षीच टीम इंडियासाठी पदार्पण केले आणि तो आता टी-20 क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज आहे.

दरम्यान, सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 2021 साली इंग्लंडविरुद्ध पदार्पण सामना खेळला होता. त्याच वर्षी, त्याला श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) पहिला वनडे सामना खेळायला मिळाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव आजच्या काळात 4 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 32 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच वेळी, त्याची वार्षिक कमाई अंदाजे 8 कोटी रुपये आहे.

Suryakumar Yadav
Team India त पुनरागमनासाठी सज्ज झाला खेळाडू, नाव ऐकताच थरथरतात विरोधक!

तसेच, सूर्यकुमार यादव 2013 पासून आयपीएलचा (IPL) भाग आहे. त्याला त्याच्या पहिल्या सत्रात खेळण्यासाठी फक्त 10 लाख रुपये मिळाले होते, तर IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 8 कोटी रुपये दिले. सूर्यकुमार ड्रीम 11 आणि फ्री हिटचाही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

Suryakumar Yadav
Team India: सामान गायब झाल्याने हा खेळाडू भडकला, हरभजनला मागावी लागली माफी!

याशिवाय, तो सरीन स्पोर्ट्स आणि इतर अनेक ब्रँड्सचा प्रचार करतो. या प्रमोशनमधूनही सूर्यकुमार करोडोंची कमाई करतो. सूर्यकुमार यादवच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे झाल्यास, त्याच्याकडे मर्सिडीज-बेंझ जीएलई कूप, निसान जोंगा, मिनी कूपर एस, ऑडी ए 6 सारख्या कार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com