सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मने, BCCIने शेअर केला व्हिडिओ

भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने मंगळवारी सेंट किट्समधील वॉर्नर पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजयी 76 धावांची खेळी खेळली आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak

भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मंगळवारी सेंट किट्समधील वॉर्नर पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजयी 76 धावांची खेळी खेळली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर, सूर्यकुमारने त्याच्या समर्थकांप्रती केलेल्या हावभावाने सर्वांचे मन जिंकले आहे. (Suryakumar Yadav wins the hearts of fans once again BCCI shared a video)

Suryakumar Yadav
Team India चे जानेवारी 2023 पर्यंतचे पॉवरपॅक वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने ट्विटरवर फलंदाजाचा एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो गर्दीत त्याच्या चाहत्यांशी हस्तांदोलन करताना आणि त्यांना ऑटोग्राफ देताना दिसून येतो आहे. व्हिडिओमध्ये काही चाहते सूर्यकुमारसोबत सेल्फी घेतानाही आपल्याला दिसून येतात.

सूर्यकुमार यादव त्याच्या कारकिर्दीतील सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, मी काही विशेष केलेले नाही, फक्त खेळाचा आनंद घेतला आहे.

मॅचबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया 165 रनांचा पाठलाग करत होती. या मालिकेत भारतीय संघाने आता 3-1 अशी आघाडी घेतली. सूर्यकुमार यादव आता टी-20 क्रमवारीमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com