Sushil Kumar: ऑलिम्पियन सुशील कुमारला अंतरिम जामीन मंजूर, वडिलांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित

कुस्तीपटू सुशील कुमार याला त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मानवतावादी आधारावर दिल्ली न्यायालयाने सोमवारी चार दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
 sushil kumar
sushil kumarDainik Gomantak

Interim Bail To Wrestler Sushil Kumar: सागर धनखर हत्या प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मानवतावादी आधारावर दिल्ली न्यायालयाने सोमवारी चार दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.

दरम्यान, सुशील कुमार 2 जून 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. सागर धनखर हत्या प्रकरणातील सहआरोपी असलेला ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशील कुमार याने वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मागितला होता. न्यायालयाने सोमवारी सुशील कुमारची याचिका मान्य करत चार दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.

 sushil kumar
Sagar Rana Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसांकडून 'चितपट'

दुसरीकडे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी सुशीलच्या याचिकेवर सुनावणी केली. ते म्हणाले- आरोपी सुशील कुमारच्या वडिलांचे निधन झाले आहे, हे लक्षात घेऊन हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागतील.

 sushil kumar
Sagar Dhankar Murder Case: बुडत्याचा पाय खोलात! कुस्तीपटू सुशील कुमारच्या वाढल्या अडचणी

न्यायालयाने, मानवतावादी आधारावर, 6-9 मार्चपर्यंत 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आरोपीला अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. मात्र, साक्षीदारांना असलेला धोका आणि सुशील कुमारच्या सुरक्षेचा विचार करता किमान दोन सुरक्षा कर्मचार्‍यांना 24 तास आरोपींसोबत (Accused) राहावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

त्याचबरोबर, देखरेख आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा संपूर्ण खर्च सुशील कुमारच्या कुटुंबाला करावा लागेल, असे न्यायालयाने (Court) म्हटले आहे. अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर आरोपीला 10 मार्च रोजी संबंधित कारागृह अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवाय, याच प्रकरणात फिर्यादीचे वकील नितीन एस. वशिष्ठ यांनी सुशीलच्या याचिकेला विरोध केला. हे प्रकरण साक्ष देण्याच्या टप्प्यावर असल्याने आणि आरोपीकडून साक्षीदाराला धोका असल्याने त्याला अंतरिम जामीन देणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com