रोहितला ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी तंदरूस्ती चाचणी द्यावी लागेलच?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

भारतीय क्रिकेट मंडळाचे फिजिओ नितीन पटेल हे रोहितची तंदुरुस्ती चाचणी घेणार आहेत. पटेल तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने हिरवा कंदील दाखवल्याशिवाय रोहित ऑस्ट्रेलियास जाणार नाही असे या सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली-  रोहित शर्मा अमिरातीहून भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियास जाण्याची शक्‍यता कमी असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत चाचणी झाल्यानंतरच रोहित ऑस्ट्रेलियास जाण्याची शक्‍यता आहे, असे भारतीय मंडळाच्या सूत्रांनी  सांगितले.

भारतीय क्रिकेट मंडळाचे फिजिओ नितीन पटेल हे रोहितची तंदुरुस्ती चाचणी घेणार आहेत. पटेल तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने हिरवा कंदील दाखवल्याशिवाय रोहित ऑस्ट्रेलियास जाणार नाही असे या सूत्रांनी सांगितले. कसोटी मालिकेपूर्वी रोहित तंदुरुस्त व्हावा ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. पितृत्वाची रजा घेतल्यामुळे रोहित ऑस्ट्रेलियातील तीन कसोटी खेळू शकणार नाही. त्यामुळे या मालिकेत रोहितने खेळणे अत्यावश्‍यक असल्याचे मंडळातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मत आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.

इशांत शर्माची तंदुरुस्त चाचणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होणार आहे. तो कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल होईल. रोहित शर्माबाबतही हेच घडू शकते. ऑस्ट्रेलियासाठी विमान सेवा उपलब्ध आहे, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले. भारत आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून आहे. त्यापूर्वी २७ नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका आणि ४ डिसेंबरपासून ट्‌वेंटी- २० मालिका आहे.

संबंधित बातम्या