Switzerland Beats Cameroon: कॅमेरून मूळाच्या खेळाडूमुळे स्वित्झर्लंडची कॅमेरूनवर मात

1-0 अशा गोलफरकाने विजय, कॅमेरून संघाचा आक्रमक खेळ वाया
Switzerland Beats Cameroon
Switzerland Beats CameroonDainik Gomantak

Switzerland Beats Cameroon: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत गुरूवारी ग्रुप जी मध्ये झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडने कॅमेरून संघावर 1-0 अशा गोलफरकाने मात केली. स्वित्झर्लंडच्या ब्रील एम्बोलो याने एकमेव गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला.

(FIFA World Cup 2022)

Switzerland Beats Cameroon
FIFA World Cup 2022: मास्क घालून मैदानात उतरणार कोरियाचा स्टार फुटबॉलर, जाणून घ्या कारण

विशेष म्हणजे ज्या ब्रील एम्बोलो याने कॅमेरून विरोधात गोल नोंदवला तो स्वतः कॅमेरून मूळ असलेला आहे. 48 व्या मिनिटाला त्याने गोल नोंदवला. शकिरी याने दिलेल्या पासवर त्याने कोणतीही चूक केली नाही. त्याने मारलेला फटका गोलजाळीत विसावला. पुर्णवेळेत आणि भरपाई वेळेतही ही गोल आघाडी कायम राहिली.

Switzerland Beats Cameroon
IND vs NZ: महान फलंदाज Viv Richards यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी टीम इंडियाचा गब्बर सज्ज!

दोन्ही संघांचा खेळ तोडीस तोड होता. दोन्ही संघांतील पासिंगदेखील अचूक होते. स्वित्झर्लंडच्या दोघा तर कॅमेरूनच्या एका खेळाडुला यलो कार्ड दाखविण्यात आले. स्वित्झर्लंडला 11 तर कॅमेरूनला 5 कॉर्नर मिळाले. तथापि, कॅमेरून संघाला मिळालेल्या संधींचे रूपांतर गोलमध्ये करण्यात अपयश आले. खरेतर कॅमेरूनचा गेम अधिक आक्रमक होता. तर स्वित्झर्लंडच्या खेळाडंमध्ये समन्वयाचा अभाव होता. तथापि, अखेर स्वित्झर्लंडनेच बाजी मारली. संपुर्ण सामन्यात स्वित्झर्लंडने चेंडुवर 51 टक्के तर कॅमेरूनने 49 टक्के नियंत्रण राखले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com