T-20 World Cup 2021: साठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा

संघात कोणाला स्थान मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता
T-20 World Cup 2021: साठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा
Team IndiaDainik Gomantak

इंग्लंडविरुद्धचा(England) चौथा कसोटी सामना (fourth test match )संपल्यानंतर उद्या 7 सप्टेंबरला भारतीय क्रिकेट नियमक मंडळ अर्थात BCCI ची बैठक होणार आहे. यामध्ये आयसीसी (ICC) टी 20 विश्वचषक 2021 या स्पर्धेसाठी टीम संघाची घोषणा होणार आहे. निवड समितीमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी होतील. या बैठकीनंतर लगेचच टी 20 विश्वचषकसाठी भारतीय संघाची(Indian cricket team) घोषणा केली जाईल.

Team India
Team Indiaला मोठा धक्का ! मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटीव्ह

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही गोष्ट समोर आली होती की, इंग्लंड विरुध्दच्या चौथ्या कसोटी सामन्यानंतर टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात येईल. बीसीसीआयककडून 15 सदस्यीय संघाची घोषणा केली जाईल. तसेच, कोरोना प्रादुर्भावामुळे बीसीसीआय कडून 3 किंवा 5 खेळाडू राखीव ठेवले जाऊ शकतात. आयसीसीकडून फक्त 15 खेळाडूंना टीममध्ये ठेवण्याची जबाबदारी बोर्डावर राहील असे नमूद केले आहे. त्याचबरोबर उद्या 7 सप्टेंबरला होणाऱ्या संघ निवडीत कोणत्या खेळाडूंना संघात स्थान दिले जाते आणि कोणाचा पत्ता कट होतो हे पहावे औत्सुक्याचे आहे.

टीम इंडिया :

विराट कोहली ,(Virat Kohli) , रोहित शर्मा (Rohit Sharma) के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, पांड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र यांच्यासह बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर आणि आर अश्विन तर राखीव खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, इशान किशन, शिखर धवन आणि राहुल चहर यांच्यातून कोणाकोणाची निवड होते. का कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी मिळते ते पाहावे लागेल

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com