इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून टी-२०चा थरार

.
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

पाकिस्तानविरुद्ध मालिका झाल्यानंतर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झटपट क्रिकेटची मालिका रंगणार आहे. यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना उद्या होत आहे.

लंडन:  पाकिस्तानविरुद्ध मालिका झाल्यानंतर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झटपट क्रिकेटची मालिका रंगणार आहे. यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना उद्या होत आहे. ही मालिका तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची आहे. कोरोना महामारीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिका बरोबरीत सोडविल्यानंतर ऑस्ट्रेलियाला नमविण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे, तर पहिले स्थान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलिया इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाने मार्च २०२० मध्ये न्यूझीलंडमध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, तर इंग्लंडच्या संघाने वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध कोरोना काळात मायदेशात सामने खेळले आहेत. तीन टी-२० सामने साउथॅम्प्टन तेथील रोझ बाउल स्टेडियमवर खेळविण्यात येतील. 

संबंधित बातम्या