टी-२० क्रिकेटमधील गोव्याचे ‘दादा’ फलंदाज

Dainik Gomantak
मंगळवार, 16 जून 2020

सगुणस्वप्नीलचा सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत ठसा

किशोर पेटकर

पणजी

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्यासाठी खेळताना सगुण कामत आणि स्वप्नील अस्नोडकर या माजी कर्णधारांनी फलंदाजीत ठसा उमटविला आहे. राज्याकडून दोघेही सर्वाधिक धावा करण्यात आघाडीवर आहेत.

डावखुरा सगुण आणि स्वप्नील यांनी टी-२० क्रिकेटमधील कारकिर्दीस एकत्रित २००७ मध्ये सुरवात केली. स्वप्नील एक वर्ष अगोदर २०१८ साली निवृत्त झालातर सगुण एक मोसम जास्त खेळला. या कालावधीत दोघांनीही सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत सामन्यांचे अर्धशतक पार केले. स्वप्नीलने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत यश मिळवत एक पाऊल पुढे टाकलेमात्र झटपट क्रिकेटला साजेशी शैली असूनही सगुणला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली नाही.

टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे सर्वाधिक धावा करण्याचा मान सगुणकडे जातो. त्याने ५८ सामन्यांत ११०.४४च्या स्ट्राईक रेटने ८ अर्धशतकांसह १४३८ धावा केल्या आहेत. स्वप्नीलने ५२ सामन्यांत १२४.८७च्या स्ट्राईक रेटने १२३५ धावा करताना ११ अर्धशतके नोंदविली आहेत.

सगुणला टी-२० क्रिकेटमध्ये दोन वेळा शतकाने हुलकावणी दिली. २०१४ मध्ये विशाखापट्टणम येथे कर्नाटकविरुद्ध तो ९५ धावांवर बाद झाला. तेव्हा त्याने ६१ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांच्या मदतीने या धावा केल्या होत्या. त्याच वर्षी तमिळनाडूविरुद्ध विशाखापट्टणम येथेच ८९ धावांवर नाबाद राहिला. तेव्हा त्याने ६१ चेंडूंतील खेळीत ५ चौकार व ७ षटकार खेचले होते. स्वप्नीलची टी-२० क्रिकेटमध्ये ७५ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. २०१७ मध्ये चेन्नई येथे आंध्रविरुद्ध ही खेळी केली होती.

 

संबंधित बातम्या