T20 WC Final: भारताप्रमाणे पाकिस्तानकडून मिळणार नाही वॉकओव्हर, शोएब अख्तरने दिला इंग्लंडला इशारा

T20 WC Fina: T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.
Shoaib Akhtar
Shoaib AkhtarDainik Gomantak

टि-20 (T20) विश्वचषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न मैदानावर होणार आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही देशांनी पूर्ण तयारी केली असून दोन्ही देशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही अंतिम सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून त्याने इंग्लंडला इशारा दिला आहे की, पाकिस्तानविरुद्ध भारतासारखा वॉकओव्हर मिळणार नाही.

अख्तर म्हणाला "फरक एवढा असेल की इंग्लंडची स्थिती चांगली आहे. इंग्लंडचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर असेल. इंग्लंडला माहीत आहे की, पाकिस्तानचे गोलंदाज भारतासारखे (India) नाहीत. इथे आपल्याला काहीतरी करून जिंकायचे आहे. इतक्या सहजासहजी वॉकओव्हर मिळणार नाही.

Shoaib Akhtar
Goa cricket: बडोद्यासमोर 'गोवा' नमला; पहिल्या दिवशी बडोदा 6 बाद 410
  • उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताविरुद्धचा सामना सहज जिंकला

उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना भारतीय संघाशी झाला. इंग्लंडने हा सामना 10 गडी राखून जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 168 धावांची मजबूत धावसंख्या उभारली होती, परंतु इंग्लंड सलामीवीरांसमोर ही धावसंख्या खूपच कमी ठरली. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या 16 षटकांत इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारतीय संघावर बरीच टीका होत होती आणि त्याचवेळी इंग्लिश संघाचे सातत्याने कौतुक होत आहे.

या सेमीफायनल सामन्याचा हवाला देत अख्तरने इंग्लंडला आव्हान दिले आहे. पाकिस्तानकडे चांगली बॉलिंग लाइनअप आहे यात शंका नाही,पण इंग्लंडमध्ये कोणतीही बॉलिंग लाइनअप उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे हे नाकारता येणार नाही. इंग्लंड फलंदाज आपल्या रंगात कायम राहिले तर पाकिस्तानच्या गोलंदाजांना जोरदार फटका बसणार हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com