T20 World Cup साठी अफगाणिस्तानने संघ केला जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

Afghanistan Team: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे.
Afghanistan Team
Afghanistan Team Dainik Gomantak

T20 World Cup: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. आगामी T20 विश्वचषक 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली बोर्डाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात अनेक नवीन आणि युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तानचे (Afghanistan) नेतृत्व करणाऱ्या मोहम्मद नबीची (Mohammad Nabi) आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. आशिया चषकाचा भाग असलेले समीउल्ला शिनवारी, हशमतुल्ला शाहिदी, अफसर झझाई, करीम जनात आणि नूर अहमद या खेळाडूंना विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नाही.

Afghanistan Team
T20 World Cup 2022 साठी पाकिस्तानचा संभाव्य संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

दुसरीकडे, मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज दरवेश रसूली, अष्टपैलू खेळाडू कैस अहमद आणि वेगवान गोलंदाज सलीम साफी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. 22 वर्षीय रसूलीने या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. बोटाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आणि शेपेझा क्रिकेट लीग 2022 मध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर, त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.

अफगाणिस्तान वेळापत्रक:

22 ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, पर्थ

26 ऑक्टोबर - अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, मेलबर्न

28 ऑक्टोबर - अफगाणिस्तान विरुद्ध टीबीए, मेलबर्न

01 नोव्हेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध TBA, ब्रिस्बेन

04 नोव्हेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अ‍ॅडलेड

Afghanistan Team
T20 World Cup 2022 नंतर विराट घेणार निवृत्ती! या वक्तव्याने उडाली खळबळ

अफगाणिस्तान टी-20 विश्वचषक संघ: मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह झदरन (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), अजमातुल्ला ओमरझाई, दरवेश रसूली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, हजरतुल्ला झाझई, इब्राहिम झदरन, मुजीब उर रहमान, नवीन अहमद हक, कॅस, रशीद खान, सलीम साफी, उस्मान गनी

राखीव: अफसर जझाई, शराफुद्दीन अश्रफ, रहमत शाह, गुलबदिन नायबी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com