T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेच्या संघावर होणार कारवाई! आले मोठे अपडेट

T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 विश्वचषक 2022 चे जेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता.
SouthAfrica
SouthAfricaDainik Gomantak

T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 विश्वचषक 2022 चे जेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु सुपर 12 फेरीत, ग्रुप 2 च्या सामन्यात नेदरलँड्ससारख्या कमकुवत संघाकडून पराभव पत्करावा लागला. 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा प्रवास थांबला. यासोबतच आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आपल्या संघावर काही कारवाई करणार का, याबाबतही अटकळ बांधली जात आहे.

'चोकर्स' दक्षिण आफ्रिकेच्या संघावर कडक कारवाई होणार!

दक्षिण आफ्रिका (South Africa) क्रिकेट बोर्ड आपल्या संघाच्या T20 विश्वचषकातून लवकर बाहेर पडण्याची चौकशी करण्यासाठी आणि पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी एक पॅनेल स्थापन करणार आहे. टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) महत्त्वपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला.

SouthAfrica
T20 World Cup: आज टिम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान; पाहा कधी, कुठं होणार सामना

हे मोठे अपडेट समोर आले

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक एनोक एन्वे म्हणाले की, 'आम्हाला कामगिरीचा आढावा घ्यावा लागेल. आम्ही एक समिती स्थापन करु. रीसेट बटण दाबण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. हे विसरुन पुढचा विचार करु, त्यासाठी स्पष्ट रणनीती आखली जाईल. आगामी विश्वचषकासाठी आम्ही चांगली तयारी करु.'

SouthAfrica
IND vs ENG T20 World Cup: टीम इंडियाला 'या' 5 कारणांमुळे मिळू शकते तिकीट टू फिनाले...

दक्षिण आफ्रिका एकदिवसीय किंवा टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला नाही

स्पर्धेपूर्वी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा दक्षिण आफ्रिका संघ कधीही एकदिवसीय किंवा टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला नाही. एन्वे पुढे म्हणाले की, 'संघ जिंकला किंवा हरला तरी आम्ही संघासोबत आहोत, पण पुढे जाऊन आणखी चांगले काय करता येईल, असा सवाल करत राहू.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com