T20 World Cup 2024 साठी ICC ने घेतला मोठा निर्णय, संघांमध्ये केला हा बदल

T20 World Cup 2024: नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करुन जिंकले.
Team India
Team IndiaDainik Gomantak

ICC T20 World Cup 2024: नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करुन जिंकले. आता पुढचा टी-20 विश्वचषक 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या यजमानपदावर खेळवला जाईल. 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी ICC ने मोठे बदल केले आहेत. या विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चला तर मग जाणून घेऊया...

सुपर-12 होणार नाही

T20 विश्वचषक 2021 आणि 2022 पात्रता टप्प्यात खेळले गेले. परंतु आता T20 विश्वचषक 2024 मध्ये ही पात्रता फेरी होणार नाही किंवा सुपर-12 टप्पाही होणार नाही. आता 2 वर्षांनंतर होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Team India
T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व सेलेक्टर्सची हकालपट्टी

हे संघ पात्र ठरले आहेत

वेस्ट इंडिज आणि यूएसए हे यजमान म्हणून 2024 च्या T20 विश्वचषकासाठी आधीच पात्र ठरले आहेत. त्याचवेळी, T20 विश्वचषक 2022 मध्ये, सुपर-12 पैकी 8 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. यामध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचा समावेश आहे. याशिवाय बांगलादेश आणि अफगाणिस्तानलाही आयसीसी क्रमवारीत स्थान मिळाले आहे. त्याचवेळी, 8 संघांना अद्याप मंजुरी देणे बाकी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com