T20 World Cup: सामन्याचा आंनद आता मैदानातून, BCCIची परवानगी

यूएई आणि ओमान येथे होणाऱ्या आयसीसी T20 World Cupच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे.
T20 World Cup: सामन्याचा आंनद आता मैदानातून, BCCIची परवानगी
T20 World Cup: BCCI allow fans in stadium Dainik Gomantak

T-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) फॅन्सना एक आनंदाची बातमी मिळाली आहे . ही बातमी भारत आणि पाकिस्तानच्या (INDvsPak) क्रिकेट चाहत्यांसाठी तर खूपच आनंदाची आहे . आयसीसी (ICC) आणि स्पर्धेचे यजमान बीसीसीआयने (BCCI) स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांच्या प्रवेशाला आता हिरवा सिग्नल दिला आहे. याचा अर्थ असा की टी -20 विश्वचषकाचे सामने हे प्रेक्षकांच्या उपस्थित होतील. चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यूएई (UAE) आणि ओमान (Oman) येथे होणाऱ्या आयसीसी टी -20 विश्वचषकाच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे.(T20 World Cup: BCCI allow fans in stadium)

ही माहिती शेअर करताना आयसीसीने म्हटले आहे की यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांना परवानगी असेल. यासह, यासाठी तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू झाली आहे. आयसीसीच्या या मेगा इव्हेंटमध्ये सुपर 12 स्टेजचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. तर या स्पर्धेतील सर्वात हायप्रोफाईल सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान एकमेकांसमोर असतील.

सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेसाठी तिकिटांची सुरुवातीची किंमत ओमानमधील 10 ओमानी रियाल आणि यूएईमध्ये 30 दिरहम ठेवण्यात आली आहे. आयसीसीनुसार, www.t20worldcup.com/tickets वरून तिकिटे खरेदी करता येतील.

T20 World Cup: BCCI allow fans in stadium
IPL 2021: PBKS ला नमवत RCB ची प्लेऑफमध्ये धडाकेबाज एन्ट्री

टी -20 विश्वचषकासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांच्या प्रवेशाबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी " “टी 20 विश्वचषक क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत खेळला जाईल याची माहिती देताना मला आनंद होत आहे. यासाठी मी युएई आणि ओमान सरकारचा आभारी आहे, ज्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याच्या चाहत्यांच्या निर्णयाला मान्यता दिली. मला मनापासून आशा आहे की आता जगातील प्रत्येक भागातील क्रिकेट चाहते संयुक्त अरब अमिराती आणि ओमानला त्यांच्या संघाचा जयजयकार करण्यासाठी पोहोचतील. प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे तयार केलेले वातावरण खेळाडूंना मैदानावर अधिक चांगली कामगिरी करण्यास मदत करेल." असे मत व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com