T20 World Cup 2021: रबाडाच्या हॅट्ट्रिकने आफ्रिका जिंकली, तरी ऑस्ट्रेलियाच क्लालिफाय

दक्षिण आफ्रिकेने (South Africa) आयसीसी विश्वचषक 2021 च्या (T20 World Cup 2021) त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात इंग्लंडचा (England) 10 धावांनी पराभव केला.
South Africa
South AfricaDainik Gomantak

दक्षिण आफ्रिकेने (South Africa) आयसीसी विश्वचषक 2021 च्या (T20 World Cup 2021) त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात इंग्लंडचा (England) 10 धावांनी पराभव केला. परंतु असे असतानाही आफ्रिका उपांत्य फेरीत पराभूत झाला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने (Kagiso Rabadane) शेवटच्या षटकात हॅटट्रिक घेत दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेतील विजयासह त्यांच्या मोहिमेचा शेवट केला. या सामन्यात संघाला इंग्लंडवर मोठा विजय आवश्यक होता. प्रथम फलंदाजी करताना टेम्बा बावुमाच्या संघाने केवळ 2 गडी गमावून 189 धावांची मजबूत धावसंख्या उभारली. संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला 132 धावांआधीच रोखण्यात त्यांना यश आले नाही. इंग्लंडने 20 षटकांत 8 गडी गमावून 179 धावा केल्या. या पराभवानंतरही इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आणि त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला (Australia) झाला, ज्याने दक्षिण आफ्रिकेशी बरोबरी 8 गुण असूनही चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर अंतिम-4 मध्ये स्थान मिळवले.

South Africa
टीम इंडिया सोडताच रवी शास्त्री सांभाळणार 'या' फ्रँचायझीची जबाबदारी!

या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर सलग 4 विजयांची नोंद करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पुन्हा एकदा उपांत्य फेरीतील स्थान ऑस्ट्रेलियाकडून गमवावे लागले. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा अवघ्या 16.1 षटकात 8 विकेट्स राखून पराभूत करुन 8 गुण मिळवल्यानंतर त्यांच्या निव्वळ रनरेटमध्ये चांगलीच सुधारली. अशा परिस्थितीत नंतर खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला स्पर्धेतील बलाढ्य संघाविरुद्ध मोठा विजय नोंदवणे आवश्यक होते. प्रथम उत्कृष्ट फलंदाजी आणि नंतर संतुलित गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला, पण उपांत्य फेरी गाठण्यासाठी ती अपुरी पडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com