''दीर्घ श्वास घ्या आणि शाकाहारी खा'' विराटचा मंत्र

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 जून 2021

जे लोक आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि मांस खात नाहीत त्यांना वीगन म्हणतात.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसमवेत प्रश्नोत्तराचे सत्र आयोजित केले होते. यामध्ये एका चाहत्याने विराटला त्याच्या डाएटविषयी (Diet) विचारले असता तो म्हणाला, माझ्या डाएटमध्ये  भाज्या, अंडी, 2 कप कॉफी, मसूर, क्किनोआ, पालक, डोसा असतो. परंतु हे सर्व मी मर्यादीत प्रमाणात घेतो. त्याच्या या उत्तरामुळे अनेकांनी विराटची टर सुध्दा उडवली. अनेकांनी विराटला अंडी खाणारा शाकाहारी माणूस म्हणून चिडवले. आता विराटनेच खुद्द यावर स्पष्टीकरण देत एक ट्विटही केले आहे. 

विराटने शाकाहारी (Vegetarian) असल्याचे स्पष्ट करत म्हटले की, ''मी कधीही वीगन असल्याचा दावा केला नाही. मी नेहमीच म्हणतो की, मी शाकाहारी आहे. दिर्घ श्वास घ्या आणि शाकाहारी खा' असे विराट आपल्या सोशल मिडियावरील ट्विटमध्ये म्हटले आहे. विराटच्या या ट्विटवर त्याच्या अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जे लोक आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि मांस खात नाहीत त्यांना वीगन म्हणतात.

भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांनाही इंग्लंड दौऱ्यासाठी परवानगी

विराटबद्दल 2019 मध्ये एक माहितीपट बनवण्यात आला होता. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, शाकाहारी झाल्यापासून तो आपल्या आयुष्यात खूश आहे. विराटने 2018 एका मुलाखती दरम्यान आपण मांसाहार सोडल्याचे सांगितले होते.

2 जून रोजी टीम इंडियाचा संघ (Team India) इंग्लडला (England) रवाना होणार आहे. इंग्लंडला पोहोचल्यानंतर टीम इंडियातील खेळाडूंना क्वारंटाइन (Quarantine) कालावधीमध्ये रहावे लागणार आहे. क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर सराव सत्रात सहभागी होऊ शकतात. १८ जूनपासून होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (World Test Championship) अंतिम सामना भारतीय संघाला न्यूझीलंड (New Zealand) विरुध्द खेळायचा आहे. 

संबंधित बातम्या