राष्ट्रीय स्पर्धा ठरल्यानुसारच घ्या : आयओए

dainik gomantak
मंगळवार, 19 मे 2020

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर पडली असून ही स्पर्धा २३ जुलै- ८ ऑगस्ट २०२१ मध्ये आता नियोजित आहे.

पणजी,

 गोव्यात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरल्यानुसारच घ्या असा सल्ला देणारे पत्र भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) नुकतेच राज्य प्रशासनास पाठविले आहे. स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकण्यास आयओएने नकार दर्शविला आहे.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर पडली असून ही स्पर्धा २३ जुलै- ८ ऑगस्ट २०२१ मध्ये आता नियोजित आहे. ऑलिंपिक वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यास आयओए अनुत्सुक असल्याचे आता या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. स्पर्धा आणखी लांबणीवर टाकल्यास त्याचा परिणाम संपूर्ण क्रीडा जगतावर होईल, असा इशारा आयओएने दिला आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढवून या वर्षीच स्पर्धा ठरल्यानुसार घ्यावी अशी सूचना आयओएकडून करण्यात आली आहे.

आयओएचे सचिव राजीव मेहता यांनी गोवा सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की ``आमच्यापाशी असलेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर २० ऑक्टोबर – ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जावी, असे अध्यक्ष डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा, आयओएचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मी जाहीर करतो.``

संबंधित बातम्या