Women
WomenDainik Gomantak

इस्लामिक देशांचा तालिबानविरोधात मोर्चा, नव्या फर्मानाचा सौदी अन् तुर्कीने केला निषेध

Afghanistan: अफगाणिस्तानात सत्ता मिळाल्यापासून तालिबान महिलांवर विविध निर्बंध लादत आहे. तालिबान सरकारने महिलांना विद्यापीठांमध्ये जाण्यास बंदी घातली आहे.

Afghanistan: अफगाणिस्तानात सत्ता मिळाल्यापासून तालिबान महिलांवर विविध निर्बंध लादत आहे. तालिबान सरकारने महिलांना विद्यापीठांमध्ये जाण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, तालिबानच्या या निर्णयाविरोधात गुरुवारी काबूलमध्ये दोन डझन महिलांनी निदर्शने केली. आता तुर्की आणि सौदी अरेबियाने या प्रकरणी तालिबान सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) अनेक क्रिकेटपटूंनीही विद्यापीठात महिलांना बंदी घालण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ असून सोशल मीडियावर खेळाडूंचे लाखो फॉलोअर्स आहेत. तालिबान प्रशासनाने या आठवड्याच्या सुरुवातीला देशभरातील महिलांना खाजगी आणि सार्वजनिक विद्यापीठांमध्ये तत्काळ प्रभावाने आणि पुढील सूचना मिळेपर्यंत उपस्थित राहण्यास मनाई करण्याचे आदेश दिले.

Women
Afghanistan: अफगाणिस्तानच्या बाल्ख प्रांतात बॉम्बस्फोट, 7 ठार; अनेकजण गंभीर

तसेच, तालिबान (Taliban) प्रशासनाने अद्याप या बंदीबाबत सार्वजनिकरित्या काही बोलले नाही किंवा त्याविरोधातील जागतिक प्रतिक्रियांना प्रतिसाद दिला नाही, तर उच्च शिक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झियाउल्लाह हाश्मी यांनी गुरुवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, या आठवड्यात एक पत्रकार परिषद आयोजित केली जाईल.

Women
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये जाणवले 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

दुसरीकडे, ऑगस्ट 2021 मध्ये सत्ता काबीज केल्यापासून तालिबानने इस्लामिक कायद्याची अंमलबजावणी करण्यास लागू केले. त्यांनी मिडल स्कूल आणि हायस्कूलमधील मुलींवर बंदी घातली आहे. महिलांना पार्क आणि जिममध्ये जाण्यासही बंदी आहे. विद्यापीठ बंदीचा निषेध तुर्की आणि सौदी अरेबियापासून सुरु झाला आहे. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेव्हलुत कावुसोग्लू यांनी गुरुवारी सांगितले की, बंदी इस्लामिक किंवा मानवतावादी नाही. आपल्या येमेनी समकक्षासह संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना, कावुसोग्लू यांनी तालिबानला त्यांचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com