Under 14 Cricket : तमिळनाडूचा गोव्यावर 97 धावा आणि डावाने दणदणीत विजय

दुसऱ्या डावात अवघ्या ५२ धावांत गारद
Cricket
CricketDainik Gomantak

Under 14 Cricket : दक्षिण विभागीय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रविवारी तमिळनाडूने गोव्यावर डाव व 97 धावांनी दणदणीत विजय मिळविला. पहिल्या डावात 65 धावा केलेला गोव्याचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 52 धावांत गारद झाला.

Cricket
ISL Football : एफसी गोवा, ओडिशासाठी उद्याचा महत्त्वाचा सामना

दोन दिवसीय सामना केरळमध्ये झाला. तमिळनाडूने पहिला डाव 5 बाद 214 धावांवर घोषित केला. त्यांना 149 धावांची आघाडी मिळाली. गोव्याच्या दुसऱ्या डावात फक्त दोघेच दुहेरी धावसंख्या गाठू शकले.

सलामीचा साई नाईक व दहाव्या क्रमांकावरील अथर्व देविदास यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. गोव्याचा हा पाच लढतीतील दुसरा पराभव आहे. अन्य तीन अनिर्णित निकालामुळे त्यांच्या खाती तीन गुण आहेत.

Cricket
Quetta Blast: पाकिस्तानमध्ये लाईव्ह सामन्यादरम्यानच स्फोट; आफ्रिदी, बाबरसह क्रिकेटर्सची धावपळ

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : सर्वबाद 65 व दुसरा डाव : 45.1 षटकांत सर्वबाद 52 (साई नाईक 10, आफ्रिदसाब राजाकानावर 0, रेयान केरकर 4, स्वप्नेश नाईक 5, शमिक कामत 1, उझैर शेख 5, श्रीयान नाईक 3, जय कांगुरी 0, स्वयम माशेलकर नाबाद 5, अथर्व देविदास 10, संचित नाईक 3, ए. विकास 3-16, व्ही. अश्वत राघवन 3-1) पराभूत

वि. तमिळनाडू, पहिला डाव : 60 षटकांत 5 बाद 214 घोषित (आर्य गणेश 68, सचिन भूपती 55, शमिक कामत 13-2-37-1, अथर्व देविदास 15-2-53-1, स्वयम माशेलकर 15-0-46-0, संचित नाईक 9-0-42-1, जय कांगुरी 7-0-31-1, रेयान केरकर 1-1-0-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com