टेनिस क्रिकेट संघ कर्णधारपदी तनिशा, साहील

स्पर्धा 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाईल. दोन्ही संघ बुधवारी रवाना होतील.
टेनिस क्रिकेट संघ कर्णधारपदी तनिशा, साहील
14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवडलेल्या गोव्याच्या मुला-मुलींच्या संघासमवेत मान्यवर.Dainik Gomantak

पणजी: तमिळनाडूतील (Tamil Nadu) नमक्कल येथे होणाऱ्या 14 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याचे दोन्ही संघ जाहीर करण्यात आले. तनिशा नाईक हिची मुलींच्या, तर साहील पारोडकर याची मुलांच्या संघ कर्णधारपदी (captain) निवड करण्यात आली.

स्पर्धा 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाईल. दोन्ही संघ बुधवारी रवाना होतील. संघांना स्पर्धेसाठी निरोप व शुभेच्छा देणारा कार्यक्रम मंगळवारी कांपाल येथील मैदानावर झाला. यावेळी अबकारी कर खात्याचे सहाय्यक आयुक्त संजीव गडकर, गोवा टेनिस बॉल क्रिकेट (Tennis Ball Cricket) संघटनेचे सचिव रूपेश नाईक, उपाध्यक्ष संध्या पालयेकर, संघ व्यवस्थापक काशिराम म्हांबरे व श्रुती विर्नोडकर, संघ प्रशिक्षक नीलेश नाईक व हेमंत खोत यांची उपस्थिती होती.

14  वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवडलेल्या गोव्याच्या मुला-मुलींच्या संघासमवेत मान्यवर.
पणजी फुटबॉलर्स अंतिम फेरीत

संघ – मुली :

मायेशा पालयेकर, रिया मालवणकर, साईशा विर्नोडकर, आर्या परब, प्राची नाईक, हिमानी धुरी, साईशा कुलपत, तनिशा नाईक (कर्णधार), मयुरा उसकईकर, सरश्री गावकर, सोनाली वेलिंगकर, सावनी म्हांबरे (उपकर्णधार), श्रेया फोंडेकर.

संघ –मुलगे :

वरद तोरसकर, साईश नाईक, पारस नाईक, आर्यन नाईक, चिन्मय केरेकर, सुबोध नाईक, राज शेट्ये, विराज तारी, साहील पारोडकर (कर्णधार), नेहाल खेडेकर, दीपकृष्ण कामत, साईश विर्नोडकर, दीप शेट्ये (उपकर्णधार), वरद लिंगुडकर.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com