Tea Controversy: MSK प्रसाद यांच विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या वादावर मोठं विधान 

Tea Controversy: MSK प्रसाद यांच विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या वादावर मोठं विधान 
Virat Kohli,Anushka Sharma

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली(Team India captain Virat Kohli) आणि त्याची पत्नी बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा(Bollywood star Anushka Sharma) भारतातील फेमस कपलपैकी एक आहे. शुक्रवारी साऊथॅम्प्टन येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(World Test Championship) फायनलमध्ये भारत न्यूझीलंडशी(New Zealand) सामना खेळण्यास सज्ज झाला असल्याने विराट आणि अनुष्का सध्या युकेमध्ये आहेत. 2019 च्या वर्ल्डकपदरम्यान ते दोघे इंग्लंडमध्ये एकत्र दिसले होते. यावरुन भारताचे माजी विकेटकीपर फारुख इंजिनियरने असा दावा केला होता की, निवड समितीतील एका सदस्याने अनुष्काला चहा आणून दिला.(Tea Controversy Virat Kohli and Anushka Sharmas tea controversy Read more details)

त्यांच्या या दाव्यामुळे अनुष्काचे नाव या वादात ओढले गेले होते. दरम्यान खेळात विराट कोहलीचे प्रदर्शन चांगले होत नव्हते म्हणून अनुष्का याबाबत जबाबदार धरण्यात आले. यावर बोलतांना ती म्हणाली,  येथून पुढे कोणताही वाद निर्माण करण्यासाठी मी माझे नाव वापरू देणार नाही.“जर तुम्हाला निवड समिती आणि त्याच्या पात्रतेवर काही भाष्य कराचये असेल तर ते तुमच्या मतानुसार करा पण तुमचा दावा सिद्ध करण्यासाठी किंवा तुमच्या मताला दुजोरा देण्यासाठी मला त्यामध्ये ओढू नका. अशा वादविवादात कोणालाही माझे नाव वापरण्यास मी परवानगी देणार नाही,”असे अनुष्काने स्पष्ट केले.

दरम्यान 2016 ते 2020 या कार्यकाळात भारतीय संघाचे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद हे होते. मात्र त्यांचा कार्यकाळ अनेक वादविवादांनी जखडलेला होता. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माबाबतचा वादही याच काळात झाला होता. 

चहा पिण्यावरून वाद झाला
एमएसके प्रसाद यांनी एका मुलाखती दरम्यान अनुष्का शर्माबरोबर झालेल्या वादविवादाबद्दल विधान केले आहे. खरे तर दोन वर्षांपूर्वी 2019 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताचे माजी विकेटकीपर फारुख इंजिनीअरने अनुष्का शर्माविषयी एक विधान केले, यामुळे बरीच खळबळ उडाली होती. याबाबत माजी मुख्य निवडकर्ता एम.एस.के. प्रसाद निवड समिती कडेच बोट दाखवत म्हणाले, आमच्याकडे मिकी माउस निवड समिती असून, त्याच्या पात्रतेवर देखील त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले, 2019 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान निवड समितीचे सदस्य अनुष्काला चहा देण्यास व्यस्त होते. त्यांच्या या निवेदनानंतर अनुष्का शर्मा खूप चिडली आणि तिने त्यांना योग्य उत्तर दिले.

 प्रसाद यांनी केले पुन्हा एकदा मोठे विधान 
त्यावेळी अनुष्कासोबत झालेल्या बादाबाबत एम.एस.के. प्रसाद यांनी पुन्हा मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, 'भारतीय क्रिकेटमध्ये निवड समितीचे काम करणे खूप कठीण आहे, कारण येथे तुम्हाला यशाचे श्रेय क्वचितच मिळते. खराब कामगिरीमुळे संघात खेळाडूंची निवड करावी की त्यांना वगळावे याबद्दल हा निर्णय महत्त्वाचा असतो, कारण यावरुन बरीच टीका होते. अनुष्का सोबत झालेल्या वादात विनाकारण निवड समितीला गोवले गेले. पण ऑस्ट्रेलिया विरुध्द कसोटी मालिकेत काही मोठे खेळाडू संघात नसले तरीही भारतीय संघाने या मालिकेत विजय मिळवीला आहे.  तेव्हा निवड समितीला कोणतेही श्रेय दिले गेले नाही. बाहेरच्या लोकांनी मान्य करो किंवा न करो, परंतु आतील वर्तुळात असेलल्या लोकांना माहित आहे की आपण काय केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com