इंग्लंडविरुध्दच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मार्च 2021

मुंबईकर सूर्यकुमार यादवला या एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली:(Team India announced for ODI series against England) भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेनंतर उभय संघात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे असून मुंबईकर सूर्यकुमार यादवला या एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना  23  मार्च खेळवला जाणार आहे.

इंग्लंडविरोधील चौथ्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाल्यानंतर मुंबईकर सूर्यकुमार यादवने अर्धशतक साजरे करत सगळ्य़ांना आपली नोंद घेण्यास भाग पाडले. विजय हजारे स्पर्धेमध्ये उत्तम धावसंख्या करणाऱ्या पृथ्वी शॉ ला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणारा गोलंदाज प्रसिध्द कृष्णाला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामाना 23 मार्च, दुसरा सामना 26 मार्च तर तिसरा सामना 28  मार्चला होणार होणार आहे. विशेष म्हणजे ही तीन दिवसीय मालिका पुण्य़ात खेळवले जाणार आहेत.(Team India announced for ODI series against England)

IND vs ENG: टीम इंडिया विरुद्ध टी -20 सामन्यात थर्ड अंपायरने 'ते' 2...

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार) रोहीत शर्मा (उपकर्णधार) , शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), के. एल. राहुल, यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, क्रुणाल पांड्या, वॉश्गिंटन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिध्द कृष्णा, शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या