INDvsENG 3rd Test : पाहुण्या इंग्लंड संघावर टीम इंडियाचा 10 गडी राखून विजय 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा डे नाईट कसोटी सामना भारतीय संघाने आपल्या खिशात घालत, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुण्या संघावर बढत मिळवली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा डे नाईट कसोटी सामना भारतीय संघाने आपल्या खिशात घालत, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुण्या संघावर बढत मिळवली आहे. आणि विशेष म्हणजे भारतीय संघाने हा सामना दुसऱ्या दिवशीच जिंकला आहे. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 81 धावाच केल्या होत्या. व त्यामुळे टीम इंडियाला फक्त 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. ते भारताने सहजरित्या पार केले. रोहित शर्माने यावेळेस 25 चेंडूंचा सामना करताना एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. तर शुभमन गिलने 21 चेंडूंचा सामना करताना एक षटकार आणि एक चौकार लगावत 15 धावा केल्या. 

अश्विनचा विक्रम; मुथय्या मुरलीधरननंतर अशी खेळी करणारा ठरला दुसरा गोलंदाज  

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिला दिवस संपला तेंव्हा भारतीय संघाने तीन गडी गमावत 99 धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज टीम इंडियाचा संघ देखील 53.2 षटकात 145 धावांवर सर्वबाद झाला. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला जॅक लीचने 7 धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ पहिल्या दिवशी अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला देखील जॅक लीचने 66 धावांवर असताना पायचीत केले. त्यानंतर रिषभ पंत, अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि जसप्रित बुमराह या सगळ्यांना जो रूटने लागोपाठ बाद केले. त्यामुळे पहिल्या डावात टीम इंडियाने 33 धावांची आघाडी घेतली होती. 

टीम इंडियाचा डाव झाल्यावर पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजी साठी म्हणून मैदानात आलेल्या इंग्लंडच्या संघाला अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनच्या जोडीने चांगलाच धक्का दिला. जॅक क्रॉउली, डॉम सिब्ले, जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांना अक्षर पटेलने सलग बाद केले. त्यानंतर बेन स्टोक्स मैदानावर टिकण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला अश्विनने पायचीत केले. बेन स्टोक्स धावांवर बाद झाला. यानंतर ओली पोपला देखील फक्त 12 धावांवर अश्विननेच माघारी धाडले. 

ISL2020-21: नॉर्थईस्टसाठी आणखी एक `फायनल` केरळा ब्लास्टर्सला नमविल्यास प्ले-ऑफ...

इंग्लंडचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर बेन फॉक्सला अक्षर पटेलने बाद केले. यानंतर जोफ्रा आर्चर आणि जॅक लीचला अश्विनने बाद केले. तर जेम्स अँडरसनला वॉशिंग्टन सुंदरने रिषभ पंत करवी झेलबाद केले. त्यामुळे इंग्लंडचा संघ 30.4 षटकात 81 धावांवर सर्वबाद झाला. आणि विजयासाठी भारतीय संघाला फक्त 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे टीम इंडियाने आरामशीर गाठले. व त्यासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 2 - 1 ने बढत मिळवली आहे.            

संबंधित बातम्या