IND vs NZ: गंभीर-वेंगसरकरांनी केलेला 'तो' पराक्रम करण्यास 13 वर्षांनंतर 'रोहितसेना' सज्ज!

रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला 13 वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्ध मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.
Team India
Team India Dainik Gomantak

India vs New Zealand: न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील सध्या वनडे मालिका सुरू असून अखेचा वनडे सामना 24 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दरम्यान, इंदोरला होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तसेच मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाला तिसरा सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची संधी आहे.

जर भारताने न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा विजय मिळवला, तर असे तिसऱ्यांदाच घडेल की भारत वनडे मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश देईल. यापूर्वी भारताने असा कारनामा 1988 साली आणि 2010 साली केला होता.

Team India
IND vs NZ: गोलंदाजांच्या शानदार कामगिरीला, फलंदाजांची साथ! दुसऱ्या वनडेत Team India चा दणदणीत विजय

भारताने 1988 साली दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला 4-0 अशा फरकाने वनडे मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर 2010 साली गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला 5-0 अशा फरकाने पराभूत केले होते. या दोन्ही वनडे मालिका भारतातच झाल्या होत्या. आता 13 वर्षांनंतर भारतीय संघाला न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे.

त्याचबरोबर भारताने जर न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना जिंकला, तर भारताचा हा सलग 7 वा वनडे विजय असेल. यापूर्वी भारताने 2017 साली सलग 9 वनडे सामने जिंकले होते. दरम्यान, भारताने जर हा सामना जिंकला, तर वनडे क्रमवारीतही संघाला फायदा होणार आहे.

Team India
IND W vs WI W: हरमनप्रीत-मानधनाची बॅट तळपली! दणदणीत विजयासह भारतीय महिलांची फायनलकडे वाटचाल

आमने-सामने कामगिरी

भारत आणि न्यूझीलंड संघ आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 115 सामन्यांत समोरा-समोर आले आहेत. यापैकी 57 सामने भारतीय संघाने जिंकले आहेत, तर 50 सामने न्यूझीलंड संघाने जिंकले आहेत. त्याचबरोबर 7 सामन्यांचा निकाल लागलेला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे.

याबरोबरच भारतामध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ 35 वनडे सामन्यांत आमने-सामने आले आहेत. यातील 28 सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला असून न्यूझीलंडने 8 सामन्यांत विजय मिळवले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com