ICC World Cup Super League: मालिका गमावून देखील इंग्लंड पहिल्या स्थानी; तर भारत...   

ICC World Cup Super League: मालिका गमावून देखील इंग्लंड पहिल्या स्थानी; तर भारत...   
India and England

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंड संघाच्या हातातून मालिका आपल्या खिशात घातली. या विजयासह टीम इंडियाने आपल्या खात्यात 10 गुणांची भर घातली आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या खात्यात 19 पॉईंट्स होते. व त्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने पहिला आणि तिसरा सामना जिंकून मालिकेवर वर्चस्व राखले. त्यामुळे टीम इंडियाच्या खात्यात आता 29 पॉईंट्स झाले आहेत. 

याशिवाय, भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेत टीम इंडियाने विजय राखला असला तरी, क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग प्वॉइंट टेबल मध्ये इंग्लंडचा संघ वरचढच असल्याचे पाहायला मिळत आहे. या टेबल मध्ये इंग्लंडच्या संघाने 9 सामन्यांमध्ये मिळून चार विजय मिळवले असल्याने 40 गुणांसह इंग्लंडचा  अव्वल स्थानी कायम आहे. यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या खात्यावरही 40 गुण जमा आहेत. मात्र नेट रन रेटच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड पेक्षा मागे असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर, भारतीय संघाच्या खात्यावर पेनल्टी ओव्हरची भर पडली असल्यामुळे टीम इंडियाला एका गुणाचे नुकसान झेलावे लागले आहे. व टीम इंडिया क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. 

क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग प्वॉइंट टेबल मध्ये इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाने 9 पैकी चार सामन्यात विजय मिळवलेला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहा पैकी चार सामन्यात विजय मिळवला असल्यामुळे कांगारूंचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडच्या संघाने तीन पैकी तीन सामने जिंकले असल्यामुळे न्यूझीलंडचा संघ या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडनंतर अफगाणिस्थानच्या संघाने देखील तीन पैकी तीन सामने जिंकले असल्यामुळे अफगाणिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचे संघ हे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या नंबरवर आहेत.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com