IND vs NZ: पहिल्या वनडेतील ती चूक टीम इंडियाला महागात, ICCकडून मोठी कारवाई

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत झालेल्या एका चूकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर कारवाई केली आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs New Zealand ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघामध्ये बुधवारी वनडे मालिकेतील पहिला सामना हैदराबादला झाला होता. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र या विजयानंतरही भारतीय संघाला या सामन्यातील एक चूक महागात पडली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय संघाला सामना शुल्काच्या 60 टक्के दंड ठोठावला आहे. त्यांच्यावर हा दंड न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत निर्धारित वेळेपेक्षा षटकांची गती कमी राखल्याने ठोठावण्यात आला आहे.

Team India
Team India: टीम इंडियाचा 'हा' धाकड निवृत्तीनंतर मैदानात परतला, भारतासाठी विश्वचषक...!

या सामन्यात आयसीसी एलिट पॅनलमधील सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा भारताने तीन षटके उशीरा टाकली.

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेतील कमल 2.22 नुसार निर्धारित वेळेपेक्षा उशीरा टाकल्या जाणाऱ्या एका षटकामागे सामना शुल्काच्या 20 टक्के दंड आकारण्यात येतो. त्यामुळे भारताला एकूण 3 षटकांची गती कमी राखल्याने 60 टक्के दंड आकारण्यात आला.

भारतीय संघावरील हा आरोप भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मान्य केला आहे. हा आरोप पंच अनिल चौधरी, नितीन मेनन, केएल अनंतपद्मनाभम आणि जयरामन मदनगोपाळ यांनी लावला होता. रोहितने आरोप मान्य केला असल्याने याबाबत अधिकृत सुनावणी होणार नाही.

भारताने जिंकला होता सामना

हैदराबादला झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 349 धावा केल्या होत्या. भारताकडून शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावांची द्विशतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले होते.

तसेच या डावात त्याच्यानंतर सर्वाधिक 34 धावांची खेळी कर्णधार रोहित शर्माने केली होती. गिल व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाने अर्धशतकही केले नाही. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि हेन्री शिपली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Team India
Team India New World Record: टीम इंडियाने आपल्या नावावर केला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये...!

यानंतर भारताने दिलेल्या 350 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 49.2 षटकात 337 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडची या सामन्यात फारशी चांगली सुरुवात झाली नव्हती. न्यूझीलंडने 131 धावांवरच 6 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर मायकल ब्रेसवेल आणि मिशेल सँटेनरने सातव्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी करत चांगली झुंज दिली.

पण, सँटेनर 46 व्या षटकात 57 धावांवर बाद झाला. त्यानंतर अखेरच्या षटकात ब्रेसवेलही 140 धावा करून बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com