Happy Holi 2023: रंगात रंगली टीम इंडिया, विराटपासून ते रोहितपर्यंत...!

Team India Holi Celebration: देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जग जर रंगांनी भरलेले असेल, तर क्रिकेटपटू रंगापासून कसे दूर राहतील?
Team India
Team IndiaDainik Gomantak

Team India Holi Celebration: देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जग जर रंगांनी भरलेले असेल, तर क्रिकेटपटू रंगापासून कसे दूर राहतील?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनीही थाटामाटात होळी साजरी केली. विराट कोहलीपासून रोहित शर्मापर्यंत सगळे मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.

दरम्यान, शुभमन गिलने टीम इंडियाच्या (Team India) बसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहलीपासून रोहित शर्मापर्यंत सर्वजण रंगात रंगलेले दिसत आहेत.

Team India
Team India: रवींद्र जडेजाचे बल्ले-बल्ले, कसोटी मालिकेदरम्यान ICC ने केली 'ही' मोठी घोषणा

दुसरीकडे, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्माने लिहिले की, 'हा रंग, आनंद, भोजन, मित्र आणि कुटुंबियांसोबत मजा करण्याचा दिवस आहे. आशा आहे की तुम्ही सर्व मनापासून आनंद घ्याल. होळी उत्साहाने साजरी करा.'

Team India
Team India: केएल राहुलची कोण घेणार जागा? कसोटी उपकर्णधारासाठी 'हे' 3 खेळाडू आहेत पर्याय

तसेच, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-1 ने पुढे आहे. मालिकेतील शेवटचा सामना जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यावर संघाचे लक्ष असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com