टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पुन्हा अपयशी, केपटाऊन कसोटीसह मालिका गमावली

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेट राखून पराभव करत मालिका 2-1 अशी जिंकली.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पुन्हा अपयशी, केपटाऊन कसोटीसह मालिका गमावली
South AfricaDainik Gomantak

दक्षिण आफ्रिकेला मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत करण्याचे भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण भंगले. 2018 प्रमाणेच पुन्हा एकदा टीम इंडियाच्या खराब फलंदाजीने इतिहास रचण्याची संधी हिरावून घेतली. केपटाऊनमध्ये (Cape Town) खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा 7 विकेट राखून पराभव करत मालिका 2-1 अशी जिंकली. सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 111 धावांची गरज होती, तर भारताला 8 विकेट्स मिळवायच्या होत्या, परंतु कीगन पीटरसन आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य फार त्रास न होता पूर्ण केले.

दरम्यान, विराट कोहलीच्या (virat kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघ 2018 नंतर दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. यावेळी टीम इंडियाला या ऐतिहासिक मालिका विजयाचा दावेदार मानला जात होते. एबी डिव्हिलियर्स, फाफ डु प्लेसिस आणि हाशिम आमला यांसारख्या दिग्गज फलंदाजांच्या निवृत्तीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ फारसा मजबूत दिसत नव्हता, तर प्रबळ यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकनेही पहिल्या कसोटीनंतर निवृत्ती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्याचवेळी झंझावाती वेगवान गोलंदाज एनरिक नोरखिया​दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर होता. अशा स्थितीत भारतीय संघाचा (Team India) विजय सोपा मानला जात होता, मात्र तीन आठवड्यातच सर्व अटकळ आणि दावे धुळीस मिळाले.

South Africa
IND vs SA: 'तुम्ही कधीच तरुणांचा आदर्श होऊ शकत नाही!

शिवाय, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी पुन्हा खराब झाली. केवळ ऋषभ पंतच्या जबरदस्त शतकाच्या जोरावर टीम इंडियाला केवळ 198 धावा करता आल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे माफक लक्ष्य ठेवता आले. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी 2 गडी गमावून 101 धावा करुन विजयाचा पाया रचला होता. अशा स्थितीत चौथ्या दिवशी भारताला चेंडूसह करिश्माची गरज होती, मात्र तसे झाले नाही.

सामन्याच्या पहिल्या डावाप्रमाणेच पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेसाठी नवा फलंदाज म्हणून उदयास आलेल्या कीगन पीटरसनने शानदार खेळी केली. पीटरसनने तिसऱ्या दिवशीच 48 धावा केल्या होत्या आणि चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात वेगवान फलंदाजी करत सामन्यातील दुसरे अर्धशतक आणि मालिकेतील तिसरे अर्धशतक झळकावले. पीटरसनने रासी व्हॅन डर ड्युसेनसोबत 54 धावांची भागीदारीही केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.