INDIAvsAUSTRALIA T20: ताकदीचा गेम, आज कोणाला फेम ?

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

परदेश दौऱ्यावर भारतीय संघाला ‘स्लो स्टार्टर’ म्हणून ओखळले जाते. जम बसवण्यासाठी त्यांना नेहमीच वेळ लागत असतो. यंदाच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची अशीच सुरुवात झाली आहे, पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून रुळावर आणलेली गाडी आता टॉप गिअरमध्ये चालवण्याची जबाबदारी विराट कोहलीचा संघ कशी पार पाडतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.

कॅनबेरा- ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली असली तरी अखेरच्या सामन्यात मिळवलेला विजय ट्‌वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाला प्रेरणादायी ठरणार का? आयपीएलमघ्ये विविध संघांतून चमकलेले हे स्टार खेळाडू आता एकत्रितपणे कशी कामगिरी करतात यावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. ज्या मैदानावर बुधवारी विजय मिळवला तेथेच उद्याचा पहिला ट्‌वेन्टी-२० सामना होणार आहे ही भारतासाठी जमेची बाजू आहे.

परदेश दौऱ्यावर भारतीय संघाला ‘स्लो स्टार्टर’ म्हणून ओखळले जाते. जम बसवण्यासाठी त्यांना नेहमीच वेळ लागत असतो. यंदाच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची अशीच सुरुवात झाली आहे, पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून रुळावर आणलेली गाडी आता टॉप गिअरमध्ये चालवण्याची जबाबदारी विराट कोहलीचा संघ कशी पार पाडतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याची जबाबदारी विराटसह केएल राहुल याच्यावर असणार आहे. आयपीएलमध्ये हे दोघेही चांगले बहरात होते.

संघात बदल निश्‍चित
पुढे होणाऱ्या कसोटी मालिकेचे महत्त्व आणि ट्‌वेन्टी-२०चे स्पेशालिस्ट लक्षात घेऊन भारतीय संघात प्रामुख्याने गोलंदाजीत बदल संभवत आहेत. जसप्रीत बुमराला विश्रांती देऊन महम्मद शमीला खेळवले जाऊ शकते, तसेच दीपक चहरची निवड निश्‍चित वाटत आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यातून नटराजनने यशस्वी पदार्पण केल्यामुळे त्याचे स्थान पक्के असेल. तसेच फलंदाजी अजून भक्कम करण्यासाठी अष्टपैलू फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला कुलदीप यादवऐवजी निवडले जाऊ शकते. फलंदाजीत मात्र धवनबरोबर राहुल सलामीला येण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यांतर विराट, श्रेयस आणि मनीष पांडे अशी क्रमवारी असू शकेल.

आज पहिला टी-२० सामना
 
कुठे- कॅनबेरा

 कधी- दुपारी १.४० पासून
 
खेळपट्टीची कशी आहे-  फलंदाजांना धावांचा वर्षाव करण्यास प्रेरित करणारी.
 
हवामान काय म्हणतं- क्रिकेटसाठी पोषक आणि आल्हाददायक वातावरण

संबंधित बातम्या