Video इंग्लंडलविरूद्धच्या T20 मालिकेआधी टीम इंडियाच्या शिलेदारांची धमाल मस्ती

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो रोहित शर्मा, रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यासोबत निवांत वेळ एन्जॉय करताना दिसत आहे. ते लहान मुलांच्या खेळण्यांनी खेळत आहेत.

IndiaVsEngland : इंग्लंडला 3-1 ने कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता इंग्लंडविरूद्ध संघासह 5 सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे. ही मालिका 12 मार्चपासून सुरू होईल. ज्यासाठी दोन्ही संघ प्रॅक्टीस करताना दिसून येत आहेत. दरम्यान, शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो रोहित शर्मा, रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यासोबत निवांत वेळ एन्जॉय करताना दिसत आहे. ते लहान मुलांच्या खेळण्यांनी खेळत आहेत. रिषभ पंत शिखर धवनला चेंडू फेकून मारताना दिसत आहे. रोहित शर्मादेखील त्याला चेंडू मारत आहे. कुलदीप यादव लहान मुलांसाठी असलेली सायकल चालवताना दिसत आहे. 

आयपीएल 2021 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; 9 एप्रिलपासून सुरू होणार

शिखर धवन, रोहित शर्मा, रिषभ पंत आणि कुलदीप यादव मुलांच्या खेळण्यांसमोर उभे असल्याचे या व्हिडिओत पाहता येईल. हा व्हिडिओ शेअर करताना शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "कितीही मोठे झालात, तरी मनातलं बालपण जाता कामा नये, काम महत्त्वाचं आहेच, पण रिलॅक्स राहण्यासाठी मस्ती पण महत्त्वाची आहे. कुलदिप यादव त्याची पहिली राईड घेत आहे." त्याने हा व्हिडिओ 7 मार्चला शेअर केला आहे, ज्याने आतापर्यंत 2.8 दशलक्ष दृश्ये मिळविली आहेत. तसेच. लाखाहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. युजवेंद्र चहलने कमेंट्समध्ये लिहिले की, 'मी खोलीतून सर्व काही पाहत होतो, लहान मुलांची गंमत.'

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलम्ध्ये पोहोचल्यावर के एल राहुलने केलं विराट कोहलीचं कौतुक

संबंधित बातम्या