टीम इंडियातील 'या' खेळाडूंनी केले घटशस्फोटीत महिलांशी लग्न

देशातील असे काही क्रिकेटपटू (Cricketers) आहेत ज्यांनी घटस्फोटित महिलांशी लग्न केले. आम्ही तुम्हाला अशाच काही क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत.
टीम इंडियातील 'या' खेळाडूंनी केले घटशस्फोटीत महिलांशी लग्न
Team IndiaDainik Gomantak

भारतात (India) क्रिकेटपटूंकडे (Cricketers) क्रिकेट चाहते सेलिब्रेटी (Celebrity) म्हणून पाहतात. मैदानाबाहेरही क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठ्याप्रमाणात चर्चा केली जाते. कोणत्या क्रिकेटपटूचे कोणासोबत प्रेमसंबंध आहेत, तसेच त्या क्रिकेटपटूने कोणाशी लग्न केले, यावरही सर्वांच्या नजरा असतात. क्रिकेटपटूंची प्रेमकथा लोकांच्या ध्यानात चांगलीच राहते. टीम इंडियामधील (Team India) क्रिकेटपटूंच्या वेगवेगळ्या आणि हटके लवस्टोरी आहेत. देशातील असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी घटस्फोटित महिलांशी लग्न केले. आम्ही तुम्हाला अशाच काही क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत.

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) 2012 मध्ये त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी असणाऱ्या आयशा मुखर्जीशी (Ayesha Mukherjee) लग्न केले. फेसबुकवर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. शिखर आणि आयेशाचे लग्न झाले त्यावेळीच आयशाचा पहिला घटस्फोट झाला होता. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुलेही होती. तरीही धवनने तिच्यावर प्रेम केले, आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, मंगळवारी रात्री या दोघांनी घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली.

Team India
Team Indiaला मोठा धक्का ! मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटीव्ह

भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादनेही (Venkatesh Prasad) घटस्फोटित असणाऱ्या जयंतीशी लग्न केले. दोघांनी प्रसादचा मित्र आणि भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेंना (Anil Kumble) भेटले आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. जयंती घटस्फोटित असल्याचा कोणताच फरक प्रसादवर पडला नाही. त्याने शेवटी जयंतीशी लग्न केले. अनिल कुंबळेचे नावही या यादीत आहे. त्याने 1999 मध्ये चेतनाशी लग्न केले. चेतनाचाही तोपर्यंत घटस्फोट झाला होता आणि तिला एक मुलगी होती. दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली आणि ते प्रेमात पडले. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुंबळेने चेतनाची मुलगीही वाढवली.

Team India
Indian women's hockey team: त्या आल्या त्या लढल्या त्या हरल्या मात्र मनं जिंकली

तामिळनाडूचा क्रिकेटपटू मुरली विजयही (Murali Vijay) या यादीत आहे. विजयचे लग्नही मागील काही वर्षांमध्ये चर्चेचा विषय बनले होते. त्याने निकिता नावाच्या महिलेशी लग्न केले जे त्याच्या मित्राची आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी होती. विजय आणि निकिताचे अफेअर होते आणि कार्तिकला निरोप दिल्यानंतर त्याने विजयसोबत सात फेरे घेतले.

मोहम्मद शमी (Mohammed Shami) देखील या यादीत समावेश आहे. शमीने हसीन जहाँशी लग्न केले. त्यावेळी हसीन जहाँ एक मॉडेल होती. दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. यापूर्वीही हसीन जहाँचे लग्न झाले होते. दोघांनाही एक मुलगी आहे, परंतु 2018 मध्ये ते दोघांमधील वैवाहिक संबंध ताणले गेले. शमी आणि त्याच्या कुटुंबावर आपला छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मात्र दोघे वेगळे झाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com