
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. संघाची अधिकृत किट 'एमपीएल स्पोर्ट्स' ने मंगळवारी जाहीर केली आहे. आगामी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये मेन इन ब्लूमध्ये नवी जर्सी असणार आहे. MPL Sports' ने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या नवीन जर्सीमध्ये दिसत आहेत.
दरम्यान, एमपीएल स्पोर्ट्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित म्हणाला, "चाहते म्हणून तुम्ही आम्हाला स्टार क्रिकेटर बनवता." तर श्रेयस अय्यर म्हणाला, "जेव्हा तुम्ही आमच्यामध्ये उत्साह भरता तेव्हा आम्ही आक्रमकरित्या खेळण्याचा प्रयत्न करतो" अय्यरचा 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी निवड समितीने सोमवारीचला 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे.
दुसरीकडे, व्हिडिओमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), हार्दिक आणि श्रेयसने नवी जर्सी परिधान आहे, जी हलक्या निळ्या रंगाची आहे. जर्सीचा रंग पूर्वीच्या जर्सीपेक्षा नक्कीच वेगळा आहे. 2020 मध्ये MPL किट प्रायोजक बनल्यानंतर ही तिसरी भारतीय जर्सी असेल.
तसेच, भारतीय संघाने (Team India) सध्या परिधान केलेली जर्सी नेव्ही ब्लू आहे. एमपीएलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, यावेळी भारतीय संघाच्या जर्सीचा रंग हलका निळा असणार आहे. अशा परिस्थितीत भारताच्या (India) नव्या जर्सीमध्ये काय खास असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर्सी अद्याप अधिकृतपणे लाँच केलेली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.