Team India: वर्ल्ड कपपूर्वी रोहित-द्रविडची घातक रणनिती, 'या' प्लॅनने संघ पुन्हा होणार चॅम्पियन!

Team India: भारताने 2011 मध्ये शेवटचा वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Team India: भारताने 2011 मध्ये शेवटचा वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. मात्र, त्यानंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर वर्ल्ड कप खेळता आला नसला तरी आता पुन्हा एकदा इतिहास रचण्याची संधी आहे.

12 वर्षांनंतर भारताला आपल्याच भूमीवर या मोठ्या ICC टूर्नामेंटचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे, ज्याचा फायदा टीम इंडियाला उचलायला आवडेल. यासाठी बीसीसीआयने विशेष योजनाही तयार केली आहे.

बीसीसीआयने तयार केला हा खास प्लान!

बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघ व्यवस्थापनासोबत बैठक घेतली आहे, ज्यामध्ये टीम इंडियाच्या फायद्याचा विचार करुन 2023 च्या वर्ल्ड कप सामन्यांचे ठिकाण ठरवण्याबाबत चर्चा झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कप सामने अशा ठिकाणी खेळवण्याची मागणी केली आहे, जिथे खेळपट्टी संथ आहे आणि फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळते.

या वर्ल्ड कपचा घरच्या मैदानावर पुरेपूर फायदा घ्यायचा असल्याने संथ खेळपट्ट्यांना प्राधान्य द्यायचे आहे, असे टीम इंडियाने बोर्डाला सांगितले.

Team India
Team India: टीम इंडियाला मिळाला धोनीसारखा खतरनाक यष्टिरक्षक, लवकरच आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार!

त्याचा खरोखरच फायदा होईल का?

रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, जर असे झाले तर तो टीम इंडियासाठी प्लस पॉइंट असेल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांना भारतात फिरकी गोलंदाजीसमोर खेळताना खूप त्रास होतो.

दुसरीकडे, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ फिरकी खेळण्यात बऱ्याच अंशी यशस्वी आहेत. अशा स्थितीत या संघांकडे पाहता भारताविरुद्ध फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या पाहायला मिळू शकतात.

भारतातील (India) नागपूर, मुंबई, दिल्ली, लखनऊ, त्रिवेंद्रम, बंगळुरु, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, धर्मशाला आणि इंदूर येथे सामने खेळवले जाऊ शकतात, असेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. मात्र, अद्याप विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

Team India
Team India: BCCI ने बदलला WTC फायनलचा संघ! 'या' 5 खेळाडूंना मिळाली संधी

या मैदानावर IND-PAK हाय व्होल्टेज सामना होणार!

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1 लाख प्रेक्षक बसून सामना पाहू शकतात. वृत्तानुसार, 2023 च्या विश्वचषकाच्या सामन्यांसाठी अनेक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव, पाकिस्तानचे बहुतेक सामने चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरु येथे खेळवले जाऊ शकतात. कोलकात्यात अजूनही चर्चा सुरु आहे.

मात्र, संपूर्ण वेळापत्रक केव्हा जाहीर होईल, त्यानंतरच हा महाअंतिम सामना कोणत्या मैदानावर होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com